आळंदीत अवतरली प्रदूषित हिमनदी इंद्रायणी बनली विषवाहिनी

आळंदी (मल्हार भाऊ काळे) आळंदी येथील इंद्रायणी नदी जलप्रदूषणामुळे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात फेसाळलेली दिसून आली इंद्रायणी नदीकाठी असणारे काही कारखान्याची रसायन युक्त पाणी तसेच नदीकाठच्या गावातील मैलामिश्रित सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते थेट इंद्रायणी नदी पात्रात सोडले जाते त्यामुळे वारंवार इंद्रायणी नदी फेसाळलेली दिसून येते दिनांक 10 रोजी रात्री इंद्रायणी नदी मोठ्या प्रमाणात जलप्रदूषणामुळे फेसाळली युक्त फेस मोठ्या प्रमाणात नदीच्या पाण्यावर दिसत होता जणू हिमनदी अवतरल्याचा भास निर्माण होत होता नदीवर बर्फ तरंतात असा भास निर्माण होत होता रात्री उशिरा विविध व्हाट्सअप ग्रुप वर त्याचे व्हिडिओ शेअर करण्यात आले महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या नद्यांमधील पाणी माणसाने सुद्धा असावे व इतर विविध मागण्यांकरिता आळंदी येथील इंद्रायणी काठी भगवान महाराज कोकरे उपोषणाला बसले आहेत त्यातच इंद्रायणी नदी जलप्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात फसवले आहे

× How can I help you?