दिवाळी पाडवा निमित्त. बिबवेवाडी येथील महेश सोसायटीमध्ये सप्तसुरांची दिवाळी संध्या कार्यक्रम घेण्यात आले. गायक दादा भूरूक व मानसी घुले यांनी हिंदी मराठी जुनी गाणी सादर करून नागरिकांचे मने जिंकली.
यावेळी दीपोत्सव व दिवाळी फराळ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर उपाध्यक्ष गौरव गणेश घुले यांनी केले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर अध्यक्ष. अजित पवार गटाचे दीपक मानकर.
माजी महापौर दत्तात्रेय धनकवडे. गणेश मोहिते. पिंपरी चिंचवड महापालिकेतील माजी महापौर भाऊसाहेब भोईर. हवेली बाजार समितीचे संचालक गणेश घुले. संतोष नांगरे. माजी नगरसेविका रूपाली धाडवे. माजी नगरसेवक दिनेश उर्फ पिंटू धाडवे आदि यावेळी उपस्थित होते