मुंबई पोलिस सायली तळेकर यांना इंडिया स्टार गौरव पुरस्कार जाहीर

_________________________

पुणे प्रतिनिधी
नवनाथ सोनवणे

“द रॉयल ग्रुप” च्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य दिव्य असा इंडिया स्टार गौरव पुरस्कार 2023 हा मॉडेलिंग क्षेत्रांत व पोलिस दलात यशस्वी भरारी घेणारी सायली तळेकर यांना जाहीर झाला. असल्याची माहिती रॉयल ग्रुपचे अध्यक्ष नितीन झगरे यांनी पत्रकारांशी बोलतांनी सांगितले.

मिसेस इंडिया मॉडेलिंग मध्ये विजयी झालेली सायली तळेकर ही मुंबई पोलिस दलात कार्यरत आहे.सायली एक उत्कृष्ट मॉडेल असून मॉडेलिंग क्षेत्रांत स्वत:चे अस्तित्त्व निर्माण केले आहे.आणि मॉडेलिंग व पोलिस क्षेत्रांत स्वत:ला झोकून दिले आहे.रॉयल ग्रुपचा हा भव्य दिव्य पुरस्कार सोहळा 04 डिसेंबर रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह येरवडा पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.

द रॉयल ग्रुपच्या वतीने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कार्य करणार्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार असल्याचे रॉयल कोकण ब्रँड अम्बेसिडर दर्शना पाटील व ऑरा पाटील यांनी सांगितले.हा भव्य दिव्य पुरस्कार सोहळा महाराष्ट्रातील यशस्वी आयोजक नितीन झगरे यांनी आयोजित केला आहे.या सोहळ्याचे प्रायोजक एन एम एंटरप्रायझेस उद्योजक नितीन मुणगेकर आहे.या सोहळ्या साठी सर्व क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहे.मिस व मिसेस इंडिया 2023 हा मॉडेलिंग शो आहे आणि या शो मध्ये पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.या पुरस्कार सोहळयासाठी विविध क्षेत्रांतील पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.ज्यांना या पुरस्कार सोहळा आणि मॉडेलिंग शो साठी नाव नोंदवायचे असेल त्यांनी 9370931509 या नंबरवर संपर्क साधावा.

जास्तीत जास्त स्पर्धकांनी या शो मध्ये सहभागी व्हावे अशी विनंती रॉयल च्या सह आयोजिका नमिताताई पाटील, सपोर्टिंग पार्टनर पुष्पा शिंदे,निशा फुलसुंदर,मॉडेल साक्षी कसबे, साक्षी देवरखकर,पल्लवी वेल्हाळ,एस.डी.आर फाउंडेशन अध्यक्षा डॉ.सीमा इंग्रोळे,ब्रँड अम्बेसिडर डॉ.स्नेहा लोंढे, आकाश रणदिवे,रेणुका ठाणगे, मॉडेल आरती भालेराव,मॉडेल नयना करवंदे,श्वेता धामापुरकर, असिस्टंट डायरेक्टर काजल जाधव,मानसी कस्तुरे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. संपादक जावेद शेख,संपादक सुनिल भोसले,संपादक विजय जगताप,संपादक प्रतापराव शिंदे,पत्रकार डॉ.युवराज शिंदे, पत्रकार रजनी शिंदे,पत्रकार हेमंत पाटील,प्रकाश यादव,सागर पवार,दिनेश चौधरी,रोहन सकपाल यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

× How can I help you?