आज आळंदी बंद ; आळंदी देवस्थान विश्वस्तपदी स्थानिकांना डावललेआळंदी पोलीस स्टेशन बैठक ; स्थानिक ग्रामस्थ यांचा निर्णय कायमआळंदीत वातावरण तापले ; ग्रामस्थां मधून संताप ; नाराजी


आळंदी (मल्हार भाऊ काळे) : श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी विश्वस्त मंडळावर आळंदी ग्रामस्थांना विश्वस्तपदी डावलण्यात आल्याने मंगळवारी ( दि. ५ ) जाहीर करण्यात आलेला आळंदी बंद ठेवण्यात येणार आहे. या संदर्भात आळंदी पोलीस स्टेशन मध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी व आळंदी ग्रामस्थ यांच्यात सुसंवाद बैठक व स्थानिकांची भूमिका समजून घेण्यासाठी बैठक झाली. या बैठकीत मंगळवारी आळंदी बंद व जाहीर मोर्चाचे व महाद्वारात सभा होणार असल्याचे स्पष्ठ करण्यात आले. आळंदी देवस्थान मध्ये विश्वस्त निवडी संदर्भात आळंदीत आंदोलन छेडण्यात आले असून येत असलेल्या प्रतिक्रियेवर आळंदी ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करीत अधिक तीव्र आंदोलन शांततेत छेडले जाईल असा इशारा आळंदी ग्रामस्थांनी दिला आहे.


आळंदी पोलिस स्टेशन मध्ये पुकारण्यात आलेल्या मंगळवारी ( दि. ५ ) आळंदी बंद च्या संदर्भात पोलीस स्टेशन मध्ये पोलीस अधिकारी आणि आळंदी ग्रामस्थ यांच्यात संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पिपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह गौर, आळंदी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे यांनी बैठकीचे नियोजन करून प्रभावी संवाद साधला.

यावेळी आळंदीकर ग्रामस्थांची भावना आणि मते जाणून घेत कार्तिकी यात्रा असल्याने बंद मध्ये राज्यातून आलेल्या भाविकांची गैरसोय तसेच अनुचित प्रकार होऊ नये यासाठी दक्षता बाळगत बंद शिथिल करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र आळंदीतील ग्रामस्थांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन शांततेत बंद आणि सकाळी दहा वाजता नगरप्रदक्षिणा मार्गाने निषेध मोर्चाचे तसेच महाद्वारात सभा नियोजित करण्यात आली आहे. यावेळी ग्रामस्थांनी आपापल्या भावना सांगत संवाद साधला.

शांततेच्या मार्गाने आंदोलन व्हावे अशी यावेळी पोलीस प्रशासनाने अपेक्षा व्यक्त केली. यावेळी माजी नगरसेवक डी.डी. भोसले पाटील, माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, नंदकुमार कुऱ्हाडे, अशोक उमरगेकर, साहेबराव कुऱ्हाडे, संजय घुंडरे, विष्णू वाघमारे, राहुल चव्हाण, पुरुषोत्तम महाराज पाटील, महादेव पाखरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आळंदी संस्थानचे प्रमुख विश्वस्तानी केलेल्या वक्तव्याने आळंदीत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करीत देवस्थानचे विश्वस्त मंडळावर स्थानिक नागरिकांना डावलल्याने निषेधार्थ आळंदी बंद मंगळवारी ( दि. ५ ) आळंदी बंद होणारच असे आळंदीकर ग्रामस्थांनी पोलिस स्टेशन मधील बैठकीत स्पष्ट केले. आळंदीत यात्रेस आलेल्या भाविकांची गैरसोय होणार नाही. याची दक्षता घेण्याचे सूचना यावेळी देण्यात आल्या.

× How can I help you?