आळंदीत पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी शिबीरमराठी पत्रकार परिषदेचा ८५ वा वर्धापन दिन साजरा

आळंदी ( मल्हारभाऊ काळे) :

मराठी पत्रकार परिषदेचा ८५ व्या वर्धापनदिना निमित्त आळंदीतील अमृत हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या वतीने पत्रकारांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उत्साहात आयोजन करण्यात आले. यास आळंदी परिसरातून मोठा प्रतिसाद मिळाला. पुणे जिल्ह्यातील ३०६ पत्रकारांची तपासणी करण्यात आल्याचे हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाचे अध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी सांगितले.


मराठी पत्रकार परिषदेच्या ८५ व्या वर्धापन दिना निमित्त मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी केलेल्या आवाहन नुसार पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, पुरंदर, हवेली, बारामती, इंदापूर, दौंड, जुन्नर, चाकण या पत्रकार संघांनी पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले होते. ३०६ पत्रकारांनी या शिबिरात सहभागी होत तपासणी करून घेतल्याचे पुणे जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर यांनी सांगितले.


मराठी पत्रकार परिषद विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे यांनी केलेल्या सूचने नुसार ३ डिसेंबर २०२३ रोजी सर्व महाराष्ट्रभर आरोग्य तपासणी शिबीर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांच्या मार्गदर्शनात पुणे जिल्ह्यातील जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकाऱ्यांनी आपापल्या तालुक्यामधील रुग्णालयात आरोग्य शिबीराचे आयोजन केले होते. तालुक्यातील शिबिराची जबाबदारी त्या तालुक्यातील जिल्हा पदाधिकारी, तालुका अध्यक्ष आणि तालुका पदाधिकारी यांनी समर्थपणे पेलली. हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ चाकण खेड चे वतीने आळंदी येथील अमृत हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर मध्ये डॉ. नितीन पाटील, डॉ. अंबालाल पाटील, डॉ. नितीनकुमार जाधव, आळंदी चऱ्होली डॉक्टर्स असोशिएशन चे अध्यक्ष डॉ. विकास पाटील, डॉ. मनोज राका, डॉ. जीवन बागमार, डॉ. रोहित पाटील, युवराज पटेल, प्रतीक मराठे यांनी परिश्रम घेतले. यावेळी श्री आळंदी धाम सेवा समिती अध्यक्ष राहुल चव्हाण यांचे वतीने पत्रकारांची सूर्या ऑप्टीकलचे खुशान्त त्रिवेदी यांनी नेत्र तपासणी करीत मोफत चष्मे वाटप करण्यात आले. हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाचे अध्यक्ष अर्जुन मेदनकर, महादेव पाखरे, गौतम पाटोळे यांनी शिबिराचे यशस्वीतेस परिश्रम घेतले. यावेळी सचिन महाराज शिंदे, गोविंद ठाकूर तौर, संकेत वाघमारे आदी उपस्थित होते.

× How can I help you?