आळंदी ( मल्हारभाऊ काळे ) : येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी विश्वस्त मंडळावर स्थानिक विश्वस्त घेताना निवड प्रक्रियेत स्थानिकांना डावलण्यात आल्यानं आळंदी ग्रामस्थांनी मंगळवारी ( दि. ५ ) आळंदीतील पायरी पूजन झाल्या नंतर आळंदी बंदची हाक दिली होती. यास परिसरातून मोठा प्रतिसाद मिळाला. आळंदी संस्थान कमेटी वर तीन विश्वस्तांची नुकतीच नियुक्ती जाहीर झाली . यामुळे आळंदीतील विश्वस्तांची नियुक्ती न झाल्याचे उघड झाल्याने आळंदीत या निवड प्रक्रियेवर ताशेरे ओढत आळंदीत बंद पाळण्यात आला.
नवीन विश्वस्तांमध्ये योगी निरंजननाथ, राजेंद्र उमाप आणि डॉ.भावार्थ देखणें यांचा समावेश आहे. यात एकही विश्वस्त आळंदीतील नसल्याने आळंदीत संताप व्यक्त करण्यात आला. यापूर्वीचे तीन विश्वस्तान मध्ये विकास ढगे पाटील, योगेश देसाई व लक्ष्मीकांत देशमुख या तीन विश्वस्तांना मार्च २०२४ पर्यंत मुदत वाढवून देण्यात आल्याने देखील आळंदीत नाराजी आहे.
तीन वेळा मुदतवाढ दिल्याने यात आणखी भर पडली. आळंदीतील स्थानिकांना पुन्हा एकदा डावलण्यात आल्याने आळंदी बंद ची हाक देत आळंदीत बंद पाळण्यात आला. कार्तिक वद्य अष्टमी दिनी श्रीगुरु हैबतबाबा पायरी पुजन सोहळा झाल्या नंतर मोर्चाचे आणि आळंदी बंद पाळण्यात आला .
यास मोठा प्रतिसाद मिळाला. ११ वाजता मोर्चा चाकण चौक मार्गे निषेध मोर्चाला सुरुवात झाली. समारोप महाद्वारात जाहीर सभेने झाला. प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांच्या आळंदीकरांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध यावेळी स्थानिक पदाधिकारी यांनी केला. आळंदीतील मान्यवर पदाधिकारी यांनी यावेळी मार्गदर्शन करीत शांततेत आंदोलन केले. यावेळी पोलिस बंदोबस्त तैनात होता. दुपार नंतर भाविकांची गैर सोय होऊ नये यासाठी बंद शिथिल करण्यात आला. आळंदी पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी यांनी बंदोबस्त ठेवून अनुचित प्रकार होऊ नये यासाठी प्रभावी दक्षता घेत कामकाज पाहिले