बोपोडी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दीना निम्मित बोपोडी काँग्रेस कार्यालयात महामानव डॉ.आंबेडकरांच्या प्रतिमेस ऍड. रमेश पवळे सरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
आणि मेणबत्ती प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबिसि विभाग सरचिटणीस ज्योतीताई परदेशी, काँग्रेस उपाध्यक्ष करीमभाई तुर्क,जेष्ठ काँग्रेस नेते मैनुउद्दीन अत्तार, पुणे शहर महिला काँग्रेस अध्यक्ष अ. नु . विभाग सुंदरताई ओव्हाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष विजय जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर चिटणीस शशिकांत पांडुळे, राष्ट्रवादी काँग्रेस सादिकभाई शेख, सुनील भालेराव, शुभांगी नाईक, मिलिंद माने इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे शहर सरचिटणीस असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेस/ बोपोडी ब्लॉक अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष साजिदभाई शेख यांनी केले.