बोपोडी : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दीना निम्मित बोपोडी येथील डॉ. आंबेडकर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य दिव्य प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती प्रज्वलित करून उपस्थित उपासक आणि उपासक यांनी सामूहिक वंदना घेत अभिवादन केले.
या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर सामाजिक कार्यकर्ते सुनील माने, आनंद छाजेड, ऍड. रमेश पवळे, शशिकांत भालेराव, राजश्री कांबळे, वैशाली गायकवाड यांनी भाष्य केले.
या अभिवादन कार्यक्रमास आकाश कांबळे, सुधाकर कांबळे, सुभाष गजरमल , योगेश गायकवाड, विनोद माने,रुक्मिणी सोनकांबळे, चारुशीला भालेराव, शशिकला कांबळे, अश्विनी गायकवाड, आणि सर्व उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश भालेराव यांनी केले.