पंचशील बुद्ध विहार दिघी येथे बाबासाहेबांना अभिवादन

पंचशील बुद्ध विहार दिघी येथे बाबासाहेबांना अभिवादन भारतरत्न मित्रमंडळाच्यावतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने पंचशील बुद्ध विहार, दिघी येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला.


यावेळी परिसरातील बहुसंख्य बौद्ध उपासक उपासिका अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते.


आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक, विचारवंत, आदर्श व्यक्तिमत्त्व आयु. वसंतराव साळवे प्रमुख पाहुणे वक्ते यांनी आपल्या प्रबोधनातून डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक चळवळीवर सखोल विश्लेषण करून विचार मांडले. बाबासाहेबांना अपेक्षित समाज जोपर्यंत निर्माण होत

नाही तोपर्यंत हा समाज प्रगती करू शकत नाही असे प्रतिपादन केले. स्वातंत्र्य पूर्व व नंतरच्या काळातील बाबासाहेबांचा जीवन इतिहास त्यांनी सांगितला. उच्चशिक्षित असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले अतिशय संघर्षमय जीवन बाबासाहेबांचे होते.

तरीदेखील वेगवेगळ्या क्रांत्या करून समाजाला महत्त्वाच्या स्थानावर विराजमान केले. भारतीय राज्यघटना देशाला देऊन सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत देश म्हणून जगामध्ये नावलौकिक करून दिले. बौद्ध धम्माचा स्वीकार करून सर्वात मोठी धम्मक्रांती केली. अशा या अनेक कार्यावर ही त्यांनी आपल्या मनोगतातून प्रकाश टाकला.


यावेळी त्रिशरण पंचशीलाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमांचे, विचारांचे पूजन करण्यात आले. पत्रकार दत्ता सूर्यवंशी यांनी उपस्थितांना पाहुण्यांचा परिचय करून दिला.


प्रास्ताविक भाषणातून खजिनदार दिगंबर गायकवाड यांनी मंडळाचा इतिहास सांगितला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सचिव आयु समाधान कांबळे यांनी केले .कार्यक्रमाचे नियोजन अध्यक्ष आयु संदीप सोनवणे, आयु राजेंद्र गायकवाड, आयु महेश वाघमारे, आयु दत्तात्रय गायकवाड आयु चंद्रकांत मस्के आयु तेजराव डोंगरे आदींनी केले.धम्मपालन गाथा घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

.

Recent Post

× How can I help you?