आळंदी ( मल्हार भाऊ काळे) : श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७२८ व्या संजीवन समाधी दिन सोहळ्यात कार्तिकी भागवत एकादशी लाखो भाविकांच्या नामजयघोषात शनिवारी ( दि. ९ ) हरिनाम गजरात एकादशी साजरी झाली. भाविकांनी नदी घाटावर स्नान करण्यास भल्या पहाटे हजेरी लावली. प्रदक्षिणे दरम्यान रस्त्यावर भाविकांच्या गर्दीने रस्ते फुलले. भाविकांनी मंदिर परिसर, नदी घाट, आणि माऊलींचे पालखीची नगरप्रदक्षिणेस मोठी गर्दी केली. माऊलीचे पादुका पालखीचे ग्रामप्रदक्षिणेने दरम्यान भाविकांनी दर्शन घेतले.
उद्या रविवारी ( दि. १० ) ज्ञानेश्वर महाराज पालखी रथोत्सवासाठी मंदिरातून गोपाळपुर येथे माऊलीची पालखी खांद्यावर घेऊन आळंदी ग्रामस्थ येतील. त्यानंतर गोपाळपुरा येथून रथोत्सवास पूजा बांधीत सुरुवात होणार आहे. मंदिरात एकादशी दिनी प्रथापरंपरांचे पालन करीत साजरी झाली. पंढरपूर येथून संत नामदेव, श्री पांडुरंग, श्री पुंडलिकराय यांचे पादुका पालखी सोहळे नामगजरात अलंकापुरीत आले आहेत. येथेही श्रींचे दर्शनास भाविकांची मोठी गर्दी होती.
कार्तिकी एकादशी पहाट पूजेस खेडचे प्रांत जोगेंद्र कट्यारे, तहसीलदार प्रशांत बेडसे, विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त डी. जी. लांघी, आळंदी नगरपालिकेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे, आळंदी मंडलाधिकारी स्मिता जोशी, माजी नगराध्यक्ष शारदाताई वडगावकर, मंदाताई वाघमारे, माजी नगराध्यक्ष माऊलींचे मानकरी राहुल चिताळकर पाटील, माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील, माजी उपाध्यक्ष सागर भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, रमेश पाटील, सतीश नांदुरकर, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे, मानकरी योगेश आरु, स्वप्निल कुऱ्हाडे, साहिल योगीराज कुऱ्हाडे, संजय घुंडरे, निलेश लोंढे महाराज, ज्ञानेश्वर मंदिराचे व्यवस्थापक माऊली वीर, तुकाराम माने, सोमनाथ लवंगे, संजय रणदिवे, श्रीकांत लवांडे, महादेव रत्नपारखी, पालखी सोहळा मालक राजेंद्र आरफळकर, श्रींचे चोपदार बाळासाहेब रणदिवे चोपदार, राजाभाऊ रंधवे चोपदार यांचेसह विविध संस्थांचे पदाधिकारी, मानकरी, आळंदी ग्रामस्थ उपस्थित होते.
पहाट पूजेस मंदिर स्वकाम सेवा मंडळाचे अध्यक्ष सुनील तापकीर, महिला अध्यक्षा आशा तापकीर, श्रीकृष्ण नेवासे महाराज यांचे मार्गदर्शनात देवस्थांनचे नियंत्रणात सेवकांनी स्वच्छता होत असतानाच पहाट पूजेचे तयारीने मंदिरात वेग घेतला. मंदिरात स्वच्छतेची सेवा होताच दरम्यान घंटानाद झाला. एकादशी दिनी पहाट पूजा आळंदी देवस्थानचे प्रथा परंपरांचे पालन करीत त्यांचे निर्देशांचे पालन करीत उत्साहात सुरु झाला. कार्तिकी यात्रेस भाविकांची गर्दी एकादशी दिनी वाढली. सोहळ्यातील पहाट पूजेस भाविक, मानकरी, वारकरी, पदाधिकारी यांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. पहाटे घंटानाद झाल्या नंतर दीडच्या सुमारास सुमारास पवमान अभिषेक व ११ ब्रम्ह्वृंदांचे उपस्थितीत वेदमंत्र जयघोष श्रीक्षेत्रोपाध्ये मुख्य पुजारी मंदार जोशी व सहाय्यक पुजारी योगेश चौधरी, अमोल गांधी, नाना चौधरी, तुषार प्रसादे, महेश जोशी यांचे पौरोहित्यात वैभवी पाहत पूजा झाली. परंपरेने भीमा वाघमारे यांचे नियंत्रणात मंदिरात सनई चौघड्याच्या मंजुळ स्वराने भक्तिमय वातावरण निर्मिती केली . मंदिरात पहाट पूजे दरम्यान आकर्षक फुलांची सजावट, रंगावली लक्षवेधी झाली. देवस्थान तर्फे मंदिरात लक्षवेधी विद्युत रोषणाई तसेच रंगावली रेखाटण्यात आल्या. विद्युत रोषणाई , रंगोली आणि लक्षवेधी फुलांची आकर्षक सजावटीने यावर्षी मंदिराचे वैभव वाढले.
संत ज्ञानेश्वर माउलींच्या समाधीवर चांदीचा मुखवटा लावून पंचामृत अभिषेक पूजा ११ ब्रम्ह्वृंदांच्या वेद मंत्र जयघोषात पूजा बांधली. माऊलींचे रूप आकर्षक सजल्याने पहावेसे वाटत राहिले. यावेळी पूजेत दूध, दही, तूप, मध, साखर, आम्रखंड, सुगंधी तेल, उटणे, अत्तर आदींचा वापर झाला. लक्षवेधी मेखला, शाल, तुळशीचा हार, सोनेरी मुकुट समाधीला आकर्षक लाभला. श्रींचे पुजारी यांनी मंत्रपठन केले. माऊलींच्या आरती नंतर मानकरी, सेवेकऱ्यांना आणि मान्यवरांना विश्वस्त अॅड. विकास ढगे पाटील, राजेंद्र उमाप, भावार्थ देखणे, योगी श्रीनिरंजनजी, उपव्यवस्थापक तुकाराम माने यांचे उपस्थितीत मानकरी यांना नारळ प्रसाद वाटप झाले.
जालना जिल्ह्यातील आडे परिवार वारकरी दर्शनार्थी मानकरी
माऊलींचे संजीवन समाधी सोहळ्यातील कार्तिकी एकादशी दिनी दर्शनबारी प्रथम वारकरी दांपत्य हे जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील परतवाडी येथील जेष्ठ नागरिक दाम्पत्य शेषराव सोपान आडे आणि गंगुबाई शेषराव आडे हे मानकरी ठरले. या दांपत्यास दुसऱ्यांदा पहाट पूजेत श्रींचे दर्शनाचा मान मिळाला. ते शेती आणि शेतमजुरीचे काम करत असून गेल्या ३० ते ३५ वर्षां पासून आषाढी, कार्तिकी वारी करीत आहेत. सात तास दर्शन बारीत ते या वर्षी उभे राहिले होते. सन २०२१ मधील कार्तिकी यात्रा आळंदी वारीत देखील त्यांना प्रथम वारकरी दर्शनार्थीचा मान मिळाला होता.
यावर्षी परत श्रींचे प्रथम वारकरी दर्शनार्थी म्हणून मान मिळाल्याचा आनंद झाला असून ही माऊलींची कृपा असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, सर्वाना सुखी समाधानी व आनंदी ठेवावे हीच माऊली चरणी प्रार्थना. आळंदी देवस्थानचे वतीने आडे परिवाराचा माऊलींची प्रतिमा, पुष्पहार, श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन श्रींचे गाभा-यात मानाचे वारकरी आडे परिवार यांना विश्वस्त अॅड विकास ढगे पाटील यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी देवस्थानचे पदाधिकारी, मानकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.
श्रींचे आरती नंतर समाधी दर्शनासाठी पासधारकांना प्रथम दर्शनास सोडण्यात आले. त्याच वेळी दर्शन बारीतील भाविकांनाही दर्शनास सोडण्यात आले. पूजे नंतर भाविकांना श्रींचे दर्शन पंखा मंडपातून थेट गाभाऱ्यात झाले. कमी वेळेत जास्त भाविक दर्शन घेवून पुढे जाण्यास देवस्थानने नियोजन केले.
एकादशी दिनी माउली मंदिरात दुपारी फराळचा महानैवेद्य झाला. त्यानंतर पालखी प्रदक्षिणेस दुपारी महाद्वारातून बाहेर निघाली. मंदिरातून नगर प्रदक्षिणेला नामगजरात प्रदक्षिनामार्गे, हजेरी मारुती मंदिरात आरती, अभंग, हरिनाम गजर व प्रमुख मानकरी यांना नारळ प्रसाद देण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील, नितिन साळुके, अभि पवळे, सुनील रानवडे, सुधीर कुऱ्हाडे, सागर रानवडे यांचे सह नवशिवशक्ती मित्र मंडळ, हजरेई मारुती मंदिर, आळंदीकर ग्रामस्थ यांनी भाविकांचे सुलभ दर्शनाचे नियोजन केले. भाविक, वारकरी यांनी हरिनामाचा जयघोष करीत प्रदक्षिणा मार्गावर दुतर्फा गर्दी केली होती. हजेरी मारुती मंदिरात परंपरेचे अभंग गायन, कीर्तन झाले. मंदिरात प्रदक्षिणा झाल्यानंतर धूपारती झाली. रात्री हरिजागर झाला. मंदिरात सुरक्षेच्या साठी विशेष दक्षता घेण्यात आल्याचे माऊली वीर यांनी सांगितले. आळंदी मंदिरात देवस्थान तर्फे फराळाचे वाटप झाले. आळंदीतील विविध सामाजिक सेवा भविआ संस्था, व्यक्ती यांचे तर्फे भाविकांना मोफत चहा, पाणी, फराळाचे वाटप करण्यात आले.
अलंकापुरीतील कार्तिकी एकादशी व माऊलींचा संजीवन समाधी सोहळ्यासाठी पंढरपूर येथून श्री पांडुरंगराय, श्री पुंडलिकराय व संत नामदेवराय यांचे वैभवी पादुका पालखी यावर्षी थेट पायी पालखी सोहळ्याने परंपरांचे पालन करीत आल्या. तत्पूर्वी थोरल्या पादुका येथे विधीतज्ञ विष्णु तापकीर यांनी सोहळ्याचे स्वागत केले. आळंदीत परंपरेने पादुका पालखी सोहळ्याचे आगमन व स्वागत करण्यात आले. हजेरी मारुती मंदिरात पांडुरंगराय पादुकांचे दर्शनासही भाविक, नागरिकांनी गर्दी केली. आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी भाविकांना सेवासुविधा देण्यास विशेष काळजी घेतली.
माऊली मंदिरात कार्तिकी एकादशी दिनी झालेल्या श्रींचे पहाट पूजेतील वैभवी रूप दर्शनाने भाविकांत समाधानाचे वातावरण होते. लक्षवेधी विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळला. इंद्रायणी नदी घाटावर भाविकांची तीर्थक्षेत्री स्नानास हरिनाम गजरात गर्दी करून भल्या पहाटेच भाविकांनी स्नान करीत श्रींचे दर्शनास गर्दी केली. आळंदी मंदिरात आकर्षक विविध रंगी फुलांची पुष्प सजावट केल्याने अनेकांनी सेल्फी घेत सजावट पाहत दर्शन घेतले. श्री हजेरी मारुती मंदिरात माऊलींची पालखी नगरप्रदक्षिणेस आली असता भाविकांचा हरिनाम गजर उत्साहात झाला. वारकरी, नागरिक यांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली.
आळंदीत ११ ब्रम्हवृंदाचे वेदमंत्र जयघोषात श्रींचा अभिषेक
श्रींचा पवमान अभिषेक वेदमंत्र जयघोषात श्रीक्षेत्रोपाध्ये मुख्य पुजारी मंदार जोशी, व सहाय्यक पुजारी योगेश चौधरी, अमोल गांधी, नाना चौधरी, तुषार प्रसादे, महेश जोशी यांची सेवा रुजू झाली. कार्तिकी एकादशी निमित्त माऊलींची पूजा विजय कुलकर्णी, श्रीनिवास कुलकर्णी, यज्ञेश्वर जोशी, आनंद जोशी, मुरलीधर प्रसादे, संजय प्रसादे, सुधीर तुर्की, समीर तुर्की, अमोल गांधी, जगतसुहास पोफळे, मंदार जोशी या ११ ब्रम्हवृंदाचे वेदमंत्र जयघोषात मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत झाली.
रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन महाराज शिंदे, पुणे जिल्हा वारकरी महामंडळाचे अध्यक्ष विलास तात्या बालवडकर याचेसह हजारो भाविकांनी विविध दिंड्यातुन परंपरेने हरिनाम गजरात आळंदीत नगरप्रदक्षीण पूर्ण करीत एकादशी साजरी केली. आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी नागरिकांना विविध सेवा सुविधा देण्यास परिश्रम घेतल्याने भाविकांची सोय झाली.
तीर्थक्षेत्रीच्या स्नानाचे माहात्म्य जोपासत इंद्रायणी नदी घाटाचे दुतर्फ़ा राज्यातून आलेल्या वारकारी भाविकांनी स्नानास गर्दी करून स्नान केले. एकादशी दिनी भाविक, वारकरी यांनी खांद्यावर भगव्या पताका, महिला भाविकांनी डोक्यावर तुळशी वृंदावन, गळ्यात तुळशीमाळ, टाळ, मृदूंग,वीणेचा त्रिनाद करील सांप्रदायिक खेड करीत लक्षवेधी दिंड्या दिंडीतून नगरप्रदक्षिणा हरिनाम गजरात केल्या. राज्यातून आलेल्या देवदेवतांच्या पालखी मिरवणुका दिंडीतून झाल्या. प्रदक्षिणेच्या हरिनाम गाजर,हरिपाठ, अभंग, भजन म्हणत ज्ञानोबा माऊलींचे नामजयघोष करीत ग्रामप्रदक्षिणा झाल्या. अलंकापुरीला भक्ताचा महापूर आला. सर्व रस्ते भाविकांचे गर्दीने फुलले होते. इंद्रायणी नदीवर भाविकांचे स्नानास वरील धरणातून पाणी सोडण्यात आल्याने स्नानाची सोय झाली. यासाठी पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, प्रांत जोगेंद्र कट्यारे, तहसीलदार प्रशांत बेडसे, मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी पाठपुरावा केला. भाविकांनी यामुळे प्रशासनाचे कौतुक केले.
एकादशी दिनी ही राज्यातून भाविकांचा ओघ आळंदीकडे राहिला. दुपारीही भाविक मोठ्या संख्येने आळंदीत आले. नेहमी पेक्षा मात्र यावर्षी गर्दी कमीच राहिली. मराठवाडा, विदर्भ भागातून भाविकांची संख्या रोडावली. अवकाळी झालेला पाऊस यात शेतक-यांचे झालेले नुकसान तसेच वाढती महागाई, बेरोजगारी तसेच राज्यात सुरु असलेले मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन याचा ही परिणाम आळंदी यात्रेतील भाविक, वारकरी तोच शेतकरी असल्याने यात्रेच्या उपस्थितीवर झाला. कोकण मुंबई मधून मात्र नेहमी प्रमाणे वारकरी भाविक मोठ्या संख्येने आले.
अलंकापुरी कार्तिकी यात्रा ठळक :
पोलिसांचा चोख बंदोबस्तात कार्तिकी एकादशी
माऊली मंदिर मार्गावर प्रवेशास मर्यादा
आळंदीत कोकणवासीय भाविकांची लक्षणीय हजेरी
इंद्रायणी घाटावर हरिनाम गजर ; इंद्रायणीच्या महाआरती
विना त्रास रहदारीने भाविकांची सोय
आळंदीत लक्षवेधी विद्युत रोषणाई व पुष्प सजावट
नगरपरिषदेचे चोख नियोजनाने सेवा सुविधा प्रभावी
माऊली शेखर यांचे तर्फे भाविकांना मोफत चहा वाटप