राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोफोश (श्री वत्स) या संस्थेतील लहान मुलांना अन्नदान व कपडे वाटप


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या वादिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष प्रशांत दादा जगताप व राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष कनव चव्हाण, पुणे शहर युवक अध्यक्ष किशोर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्या युवक आघाडी च्या वतीने ससून सर्वोपचार रुग्णालय येथे सोफोश (श्रीवत्स)’ या संस्थेतील अनाथ मुलांना अन्नदान व (स्वेटर) कपडे वाटप चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी, कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे युवक अध्यक्ष सिद्धांत नारायण सारवान, तसेच पुणे शहर सरचिटणीस सुशीला अविनाश गुंजाळ, पुणे शहर महिला आघाडी उपाध्यक्ष दिलशाद अत्तर, कार्याध्यक्ष आदिल सय्यद, स्वप्निल कदम, ऋषिकेश पवार, मुबारिश शेख आदि यावेळी उपस्थित होते

× How can I help you?