मेदनकरवाडीत चंपाषष्ठी महोत्सव परंपरेने साजरा

आळंदी (मल्हार भाऊ काळे) : येथील मेदनकरवाडी ( ता.खेड ) येथील ग्रामदैवत श्री खंडोबा महाराज मंदिरात चंपाषष्ठी निमित्ताने प्रथापरंपरांचे पालन करीत विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाले. श्रींचे दर्शनास तसेच तळी भंडार, नैवेद्य अर्पण करण्यासह श्रीफळ अर्पण करीत वाढ विण्यास भाविकांची मोठी गर्दी झाली होती. भाविकांनी श्रींचे दर्शनास रांगा लावून देवदर्शन घेत तळी भंडार केला.


श्री खंडोबा महाराज मंदिरात भाविकांनी तळी भंडार उधळण करण्यास गर्दी केली. यावेळी परिसरातील वातावरण खंडोबा भक्तिमय पाहण्यास मिळाले. मेदनकरवाडीचे सामाजिक कार्यकर्ते नवनाथ भुजबळ यांनी माहिती देत परंपरेने चंपाषष्टी उत्साहात मंदिर समितीचे मार्गदर्शनात साजरी झाली. मेदनकरवाडी येथील खंडोबा मंदिर पुणे जिल्ह्यातील प्रति जेजुरी म्हणून प्रसिद्ध आहे.


मेदनकरवाडी येथील श्री खंडोबा मंदिर हे अनेक वर्षांपासून प्रसिद्ध आहे. मेदनकरवाडी गावातील खंडोबा भक्त अरुण तोडकर अनेक वर्षांपासून श्रींची सेवा करीत असून यावर्षीही सेवा त्यांनी रुजू केली. श्री खंडोबा मंदिर हे देवस्थान जागरूक देवस्थान असून भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा भाविकांची आहे. यामुळे पंचक्रोशीतून भाविक नित्य नेमाने दर्शनास तसेच धार्मिक उपक्रमांस गर्दी करीत असतात

Recent Post

× How can I help you?