खान एज्युकेशन फाउंडेशन च्या वतीने इनायत उल्ला खान यांच्या स्मरणार्थ पुणे कॅम्प शिवाजी मार्केट समोरील सिद्धार्थ ग्रंथालय येथे मोफत महाआरोग्य शिबिर घेण्यात आले होते.
या आरोग्य शिबिरामध्ये मोफत डोळे तपासणी. मोफत चष्मे वाटप. मोफत औषधोपचार. मोफत दातांची तपासणी. तसेच लहान मुलांच्या अनेक आजाऱ्यांवर तपासणी करण्यात आली. या शिबिरामध्ये सुमारे 500 महिला व पुरुष यांचा सहभाग घेऊन त्याचा लाभ घेतला. या आरोग्य शिबिराचे आयोजन खान एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष गौसिया इनायत खान यांनी केले. यावेळी डॉ सुधाकर शेट्टी. डॉ महेश पवार. डॉ मंदार तोडकर. डॉ ग्रेसी मेडोंनजा. डॉ अल्पेश कटरमल. डॉ निकिता मोरणकर. डॉ अनिकेत अहिरराव इत्यादी उपस्थित होते.
शिबिर यशस्वी करण्याकरिता वैशाली शिंदे. रुकासान खान. अलमास खान. संतोष लोंढे इत्यादींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार सेक्रेटरी फिरोज मुल्ला यांनी केले