आळंदी ( मल्हार भाऊ काळे) :
इंद्रायणी माता परिक्रमा पालखी सोहळ्याचे परिक्रमेत इंद्रायणी नदी संगमावरून भाविकांनी हरिनाम गजरात इंद्रायणीतुन नावेतून प्रवास करीत नदीच्या किनाऱ्या वरून इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्यास लोकांत प्रबोधन करीत मरकळ, तुळापूर, भावडी मार्गे सोहळा मंगळवारी ( दि. २६ ) हरिनाम गजरात वडगाव काकडे – शिंदे येथे मुक्कामास विसावला. येथील ग्रामस्थांनी सोहळ्याचे स्वागत केले.
तत्पूर्वी मरकळ येथून पालखी सोहळ्याने परिक्रमेस तुळापूर कडे प्रस्थान केले होते. यावेळी मार्गावर रांगोळ्या पायघड्यांसह फटाक्याची अतिषबाजी कण्यात आली.
विविध ठिकाणी भाविकांचे अंगावर पुष्पवृष्टी देखील झाली. सोहळ्याचे अनेक गावात ग्रामस्थ भाविकांनी हरिनाम गजरात स्वागत केले. सोहळ्यात इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त व्हावी. यासाठी समाजप्रबोधन पर प्रवचन, कीर्तन सेवा तसेच ग्रामस्थांची मार्गदर्शक भाषणे झाली.
या माध्यमातून गावातून प्रबोधन, विविध धार्मिक उपचार, स्वच्छता जनजागृती करीत परिक्रमा उत्साहात गावागावांतून मार्गस्थ होत आहे. ह. भ. प. गजानन महाराज लाहुडकर, भगवान महाराज पवार, अर्जुन मेदनकर, सागर महाराज लाहुडकर, बाळासाहेब घुंडरे, गणपतराव कुऱ्हाडे आदी परिश्रम घेत आहेत
मरकळ येथील बागवान वस्तीतून हरिनाम गजरात इंद्रायणी माता की जय अशा घोषणात देत पालखी सोहळा तुळापूर कडे मार्गस्थ झाला.
तुळापूर संगम तटावर इंद्रायणी मातेची आरती करण्यात आली.
त्यानंतर नावेतून प्रवास करीत सोहळा हरिनाम गजरात पुढील वडगांव शिंदे – काकडे गावाकडे मार्गस्थ झाला. ठिकठिकाणी ग्रामस्थ भाविकांनी स्वागत केले.