खडकी शिक्षण संस्थेचे चेतन दत्ताजी गायकवाड इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज मध्ये लसीकरण शिबिर तसेच आर्ट आणि क्राफ्ट प्रशिक्षण संपन्न

  शुक्रवार दि.५/१/२०२४ रोजी खडकी शिक्षण संस्थेचे चेतन दत्ताजी गायकवाड इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज मध्ये खडकी कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल तर्फे धनुर्वात व घटसर्प लसीकरण मोहिमेअंतर्गत दहा वर्षे व सोळा वर्षे वयाच्या विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. 

डॉ. भाग्यश्री मॅडम व  त्यांचे सहकारी यांनी लसीकरण अतिशय योग्य पद्धतीने पार पाडले. या मोहिमेंतर्गत ८० विद्यार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घेतला. या लसीकरणास शालेय सहशिक्षिका सौ. ऋतुजा मोरे,व रजनी सपकाळ यांनी सहकार्य केले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सरिता नायर यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांना मोलाचे मार्गदर्शन केले.

      इयत्ता ६वी च्या विद्यार्थ्यांना श्री.चेतन पानसरे (स्ट्रोक फाउंडेशन) यांनी कार्डबोर्ड पासून स्टार कसा बनवावा हे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने शिकविले. विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने स्टार बनवले.

  या प्रशिक्षणास सौ. सुष्मिता चक्रवर्ती व सौ.लीना शिंदे या सहशिक्षिकांनी सहकार्य केले. तसेच दोन्हीही कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सरिता नायर उपमुख्याध्यापिका सौहनाशहा पर्यवेक्षक श्री गिरीश ननावरे शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
× How can I help you?