राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप कार्यक्रम संपन्न

नाना पेठ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) पुणे शहर सामाजिक न्याय विभाग च्या वतीने मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप कार्यक्रम संपन्न झाले या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत दादा जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी 200 जणांची नेत्र तपासणी करण्यात आली तसेच 200 जणांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले, कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग पुणे शहर महिला अध्यक्ष सुवर्णाताई माने यांनी केले, यावेळी शशिकांत सोनवणे, विजयकुमार शिंदे, अभिजीत शहा, स्वाती चिटणीस, रश्मी पठाण, क णव चव्हाण, रूपाली शिंदे, सुनंदा वाघमारे, समीर वासवंड, राहुल बेलदरे, पवन धुर्वे, विशाल भुमकर, समीर बेलदरे, श्रीकांत भालेकर, आदित्य माने, सोनू काळे,आदि यावेळी उपस्थित होते

× How can I help you?