स्वामी विवेकानंद हीच आजच्या भारतीय तरुणाईची दिशा आहे- पुणे महानगर पालिका अतिरिक्त आयुक्त.


रस्ता सुरक्षा अभियान आणि राष्ट्रीय युवा सप्ताह व माय भारत टी-शर्टचे वितरण कार्यक्रम नेहरू युवा केंद्र पुणे द्वारा शनिवार वाड्याच्या प्रांगनात केले. या कार्यक्रमाचे आयोजन नेहरू युवा केंद्र पुणे युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार केले होते. या कार्यक्रमत पुणे महानगरपालिका, हरीभाई वी. देसाई कॉलेज पुणे आणि हुजूरपागा श्रीमती दुर्गाबाई मुकुन्दास लोहिया महिला वाणिज्य महाविध्यालय पुणे यांच्या विद्यार्थी स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.
“या सप्ताह मध्ये नेहरू युवा केंद्र पुणे, मनपा पुणे, पोलीस विभाग, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) तसेच वेगवेगळी महाविद्यालये यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहरात रस्ता सुरक्षा अभियान, पथनाट्य, पर्यावरण विषयक जनजागृती, सांस्कृतिक उपक्रम’ कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच my भारत पोर्टल विषयी माहिती नेहरू युवा केंद्र पुणे चे ऑफिस सहयक स्वप्नील शिंदे यांनी प्रस्ताविक भाषणात दिली.

        कार्यक्रमात प्रथम स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या नंतर my भारत टी-शर्ट चे वितरण केले. हुजूरपागा महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी रस्ता सुरक्षा या विषयावर पथनाट्य सादर केले. शनिवार वाडा ते दगडूशेठ  मंदिर पर्यान्त रॅली कडून रस्त्याच्या कडेचा कचरा आणि प्रत्येक सिग्नल वर जे लोक ट्रॅफिकचे नियम पाळतात त्यांना गुलाब पुष्प देण्यात आले व दगडूशेठ गणपती येथे पथनाट्याने व पोलीस कर्मचारी यांना गुलाब पुष्प देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. 
        या कार्यक्रमाला उपायुक्त घन कचरा विभाग मनपा संदीप कदम, आरोग्य अधिकारी मनपा डॉ केतकी  घाटगे, केंद्रीय संचार ब्यूरो भारत सरकार चे पन्नी  कुमार, पोलिस उप निरीक्षक पुणे शहर ट्राफिक चंद्रकांत रघतवानन, इतर मान्यावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आम्रपाली चव्हाण यांनी केले. कार्यक्रम आयोजनासाठी व वी पुणेकर वर्शिप अर्थ फाउंडेशन आणि सोशल विकास फाउंडेशन यांनी मोलाचे सहकार्य केले.

Recent Post

× How can I help you?