नेहरू युवा केंद्र पुणे युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार द्वारा आयोजित “जिल्हास्तरीय विकसित भारत” वकृत्व स्पर्धा ‘माझा भारत-विकसित भारत@२०४७’ या विषयावर वकृत्व स्पर्धा हरीभाई वी देसाई महाविद्यालय पुणे येथे दिनांक १० जानेवारी २०२४ रोजी संपन्न झाली.
या स्पर्धेमध्ये 75 युवांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक कुमारी संस्कृती नंदकिशोर मते, दुसरा क्रमांक भाविका रांका आणि तिसरा क्रमांक प्रेरणा रणदिवे तसेच उत्तेजनार्थ वसुधा पाटील यांचा आला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. प्रथम क्रमांकाच्या स्पर्धकास राज्यस्तरावर पाठवण्यात आले. प्रथम क्रमांकाच्या स्पर्धकाची राज्यस्तरासाठी निवड करण्यात आली.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य हरिभाई देसाई कॉलेज डॉक्टर राजेंद्र गुरव, प्रमुख अतिथी पुना गुजराती केळवणी मंडळाचे सहसचिव श्री दिलीप भाई जगड, उपप्राचार्य एच वी देसाई कॉलेज डॉक्टर नीता बोकील आदि मान्यवर उपस्थित होते तसेच या स्पर्धेचे जजेस म्हणून प्राध्यापक डॉक्टर मीरा बडे, प्राध्यापक सचिन बेलापुरे आणि प्राध्यापक डॉक्टर अर्चना पंडित यांनी या स्पर्धेचा निकाल जाहीर केला, कार्यक्रमाचे संचालन आम्रपाली चव्हाण आणि स्वप्नील शिंदे यांनी केले. तसेच या कार्यक्रमाला वी पुणेकर, वार्षिप अर्थ फाउंडेशन आणि सोशल विकास फाउंडेशन यांनी सहकार्य केले.