दो धागे श्रध्दा के उपक्रमांतर्गत प्रभू श्रीरामांसाठी पुण्यातून वस्त्र व माता सीतेसाठी साडी अयोध्येला रवाना
वाघोली/पुणे : देशातील प्रत्येक महत्वाच्या मोहिमेत पुणेकरांचा मोठा सहभाग असतो. येत्या 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी देशभरात विविध उपक्रम राबविले जात आहेत. असाच उपक्रम वाघोली येथील सत्यनारायण jordan 4 for sale yeezy boost 350 v2 black cowboys jersey yeezy shoes for sale banchero orlando jersey cheap yeezys custom nfl jersey bouncing putty egg nike air jordan 1 mid se fsu jersey jordan max aura 4 ohio state jersey ja morant jersey original custom baseball jerseys custom uniformsक्लॉथ स्टोअर्सच्या वतीने दो धागे श्रध्दा के राबवित प्रभू श्रीरामांसाठी वस्त्र आणि माता सीतेसाठी साडी विणण्यात आली असून आज विधीवत पूजा अर्चना करून अयोध्येकडे रवाना करण्यात आली. सुमारे 12 हजार ते 13 हजार पुणेकरांच्या सहभागातून हे वस्त्र विणण्यात आले असल्याची माहिती सत्यनारायण क्लॉथ स्टोअर्सचे राजाराम अगरवाल, भरत अगरवाल, किशोर मित्तल, रुचिका मित्तल, रितेश मित्तल, निलेश अगरवाल यांनी दिली.


दो धागे श्रध्दा के हा उपक्रम 6 ते 15 जानेवारी दरम्यान राबविण्यात आला होता. या उपक्रमाअंतर्गत हे वस्त्र विणण्यात आले होते.


येत्या 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लांची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यासाठी वाघोलीतील सत्यनारायण क्लॉथ स्टोअर्स यांच्यातर्फे वस्त्र विणण्यात आले आहे. त्यासाठी हातमाग कारागिरदेखील ठेवण्यात आले होते. तसेच पुणेकरांना रामलल्लांसाठी तयार करण्यात येणारे वस्त्र विणण्याची संधी ही यावेळी उपलब्ध करुन दिली होती. या उपक्रमाअंतर्गत प्रत्येकाला हातमागावर दोन धागे विणण्याची संधी मिळाली आहे आणि याचमार्फत रामलल्लाची सेवा करण्याची संधीदेखील मिळत आहे. दो धागे श्रध्दा के म्हणत अनेक पुणेकर उत्साहाने हे वस्त्र विणण्यासाठी पुढे आले होते. अशी माहिती किशोर मित्तल यांनी दिली.
तसेच वाघोली येथील सत्यनारायण क्लॉथ स्टोअर्स मध्ये अयोध्यावरून आलेले कलश दर्शनासाठी ठेवण्यात आले होते, अशी माहिती रुचिका मित्तल देत म्हणाल्या की, आम्ही आमच्या स्टोअर्स मध्ये भगवे वस्त्र परिधान करून प्रत्येक ग्राहकाचे स्वागत जय श्रीराम म्हणत करित आहोत.
आमच्या स्टोअर्सला अयोध्येतून आलेला अक्षत कलश, रामललाचे वस्त्र, माता सीतेची साडी या सर्व गोष्टी मुळे एक प्रसन्न मंदीराचे वातावरणच तयार झाले आहे आणि अक्षत कलश दर्शन आणि वस्त्र विणण्यासाठी आलेले नारिकांमुळे आमचा उत्साह आणखीन वाढला असे मत राजाराम अगरवाल यांनी यावेळी व्यक्त केले.

रामासाठी वस्त्र विणण्यासाठी पुणेकर गर्दी केली होती. त्यात सगळ्या वयोगटातील पुणेकरांचा सहभाग दिसून आला होता. या उपक्रमात सर्वात जास्त वाघोली व आसपासच्या महिलांचा सहभाग दिसून आला. सकाळी 9 वाजेपासून ते रात्री 9 पर्यंत सत्यनारायण क्लॉथ स्टोअर्स मध्ये येऊ वस्त्र विणत होते. या उपक्रमात पुणेकरांचा हातभार लागत आहे आणि रामलल्लाची पुण्यातूनच सेवा करण्याची संधी मिळाली आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब असल्याच्या भावना पुणेकरांनी व्यक्त केल्या आहेत.

[democracy id="1"]

marketmystique

× How can I help you?