आळंदी मल्हार भाऊ काळे आळंदी येथे राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडी महाराष्ट्र यांच्या वतीने दिनांक 15 पासून इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठीची बेमुदत उपोषण सुरू केले आहे आज या उपोषणाचा पाचवा दिवस सुरू आहे महाद्वार चौकात ह भ प मोहन आनंद ओवाळ महाराज ह भ प मुबारक शेख इनामदार ह भ प दत्तात्रय साबळे यांचे उपोषण चालू आहे या उपोषणाची दखल जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतली असून व्यंकटेश दुर्वास जिल्हा सह आयुक्त नगरपालिका शाखा जिल्हा अधिकारी कार्यालय पुणे यांचे संदर्भात पत्र उपोषण करताना मिळाले आहे इंद्रायणी प्रदूषणाचा विषयाबाबत विविध मागण्यासाठी आळंदी येथे आपणा मार्फत उपोषण सुरू आहे सदर उपोषण संदर्भात प्राप्त निवेदनात केलेल्या सर्व मागण्या रास्ता असून आपल्या उपोषणाची प्रशासनाने दखल घेतली असून इंद्रायणी नदी प्रदूषणासाठी कारणीभूत ठरत असलेल्या सर्व सांडपाण्याचा सविस्तर अभ्यास करून सर्व समावेशक सविस्तर प्रकल्प अहवाल डी पी आर बनवण्याच्या कामाबाबत व पुढील कामाच्या प्रगती बाबत आढावा घेण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली गेली असून सदर बैठकीचे पत्र सोबत संलग्न केले आहे तसेच तीर्थक्षेत्र विकास आराखडा कार्यकारणी समितीचे विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली बैठक दिनांक 25 जानेवारी रोजी आयोजित केली आहे मुख्य अधिकारी आळंदी नगरपरिषद यांच्यामार्फत संदर्भ क्रमांक चार अन्वये प्राप्त अहवालानुसार आळंदी नगरपरिषद हद्दीतील चार एम एल डी क्षमतेच्या एसटीपी प्रकल्पास तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत मंजुरी प्राप्त असून सदर प्रकल्प निविदा प्रक्रिया टप्प्यानुसार असून 25 जानेवारी रोजी च्या कार्यकारणी समितीच्या बैठकीत एसटीपी प्रकल्पाची देविदा प्रक्रिया राबवून पुढील कारवाई करण्याबाबत निर्णय होणे अपेक्षित आहे तसेच आपण निवेदनात इंद्रायणी प्रदूषणाबाबत सुरू असलेल्या उपाययोजनांमध्ये नागरिकांना सहभागी करून घेण्याची आपण केलेली मागणी उपलब्ध बैठकीत मानली जाईल असे पत्रात नमूद केले आहे तसेच उपोषणाची पुरुष शासनाने दखल घेतल्या असून उपोषण स्थगित करून सहकार्य करण्याची विनंती त्यांनी त्या पत्राद्वारे केलेली आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पिंपरी चिंचवड चाकण हिंजवडी आरोग्य क्षेत्रातील व इतर शहरातील सांडपाण्यामुळे इंद्रायणी पाहुणा नदीत होणाऱ्या जलप्रदूषणावर उपाययोजना करण्याबाबतच्या विषयासंदर्भात दिनांक 25 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य इमारत चौथा मजला येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे पुरुष शासनाच्या वतीने उपस्थित मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी भेट देऊन त्या संदर्भात चर्चा केली याबाबत माहिती उपोषणकर्त्यांनी दिली तसेच इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठी उपोषण सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली