अमोल मानकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कसबा विधानसभा मतदारसंघाच्या सोशल मीडिया सेल प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे, हे नियुक्तीपत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गटाच्या) पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांच्या हस्ते देण्यात आले होते, याप्रसंगी पुणे महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते दत्ता सागरे,
राष्ट्रवादी कसबा विधानसभा कार्याध्यक्ष गोरखनाथ भिकुले, राष्ट्रवादी काँग्रेस कसबा महिला अध्यक्ष सुप्रिया कांबळे, आदि यावेळी उपस्थित होते, यावेळी अमोल मानकर म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर अध्यक्ष दीपक भाऊ मानकर यांनी माझ्यावर सोपवलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात सोशल मीडियाच्या माध्यमातून मी सर्वतोपरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करीन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकत वाढवणार पक्ष बांधणी सभासद नोंदणी व सामाजिक उपक्रमावर भर देणार,