भगवान महर्षी मार्कंडेय यांच्या जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न,

पुणे शहर पद्मशाली समाजातील कुलदैवत भगवान महर्षी मार्कंडेय यांच्या जन्मोत्सवानिमित्त गंज पेठ येथील भगवान महर्षी मार्कंडेय मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सकाळी होम हवन, अभिषेक, महाआरती, महामृत्युंजय जप, व नगर प्रदक्षिणा असे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले याप्रसंगी भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते,
यावेळी महात्मा फुले गंज पेठ पद्मशाली पंच कमिटीचे अध्यक्ष विनोद जालगी, सचिव मोहन येरवा, गोविंद चिलवेरी उपाध्यक्ष , उपसचिव रवींद्र बोगम, सदस्य सतीश साका ,युवक संघटनेचे अध्यक्ष कुमार जन्नू दिनेश दोमा, योगेश बुधारप, ओमकार मँडम,व इतर पदाधिकारी,राजु साका,तसेच माजी सरपंच सोमनाथशेठ कैंची,महिला मंडळ अध्यक्ष वंदना पासकंठी, सुनेत्रा राचरला, विद्या ईटम,अंबिका उटकुर, कमल भंडारी, स्मिता साका, आदि यावेळी उपस्थित होते

× How can I help you?