संतांचा समृद्ध वारसा स्वामी गोविंदगिरी महाराज पुढे चालवत आहेत – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

प पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या ७५ व्या वाढदिवसा निमित्त विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून शुभेच्छा
(मल्हार भाऊकाळे) : स्वामी गोविंद गिरी महाराजांचे अंतःकरण खूप विशाल आहे. राजकीय नेत्यांनी त्यांच्याकडून कसे बोलायचे हे शिकण्यासारखे आहे. कोविड काळातील त्यांची प्रवचने नागरिकांच्यात नव चैतन्य निर्माण करणारी ठरली. पूर्वीच्या संतांनी जे काम केले त्याचा समृद्ध वारसा आज स्वामी गोविंदगिरी महाराज चालवत आहेत.असे गौरवद्गार विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आळंदी येथे काढले.

परमपूज्य गोविंददेव गिरी महाराज यांच्या अम्रुतमहोत्सवानिमित्त आळंदी येथे आयोजित गीताभक्ती संमेलनात सहभागी झाले असता त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर पूज्यश्री शंकराचार्य महाराज, पुज्य श्री आनंदमूर्ती गुरु माँ, श्री पुष्पपेंद्र कुलश्रेष्टी, पूज्य श्री जितेंद्रनाथ जी महाराज, महंत डॉ राहुल बोधी जी, पदश्री दादा विधाते जी, भरत आनंद जी महाराज, स्वामी विजयेंद्र सरस्वती आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी प पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त त्यांना शाल व भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या.

तसेच उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरास भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले. यावेळी, त्यांनी आळंदी देवस्थान आणि परिसराचा आढावा घेतला.

Recent Post

× How can I help you?