बहुजन विकास आघाडी या सामाजिक संघटनेचे लोहगाव येथील कलवड वस्तीमध्ये शाखेचे उद्घाटन अखिल भारतीय मजदूर संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दीपक उमंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते यावेळी बहुजन विकास आघाडीचे पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आले होते, या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष बहुजन विकास आघाडी कोर कमिटी सेक्रेटरी अहमद सय्यद, पुणे जिल्हा अध्यक्ष अब्दुल अजीज खान, पुणे जिल्हा उपाध्यक्ष उमेश शिंदे, अझरुद्दीन शेख, जिल्हा सरचिटणीस सईद याकूब खान, जिल्हा सचिव राजू चव्हाण,
पुणे जिल्हा संपर्क प्रमुख खाजा शेख, अहमद सय्यद, बशीर शेख, कलवड शाखा क्रमांक 5 चे अध्यक्ष इमरान शेख, सुफियान शेख, समीर पटेल, जाफर मोमीन, बिलाल शेख, खदीर शेख, रब्बानी बागवान, आदि यावेळी उपस्थित होते यावेळी बहुजन विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष आमदार हितेंद्रभाई ठाकूर व आमदार क्षितिज हितेंद्र ठाकूर यांच्या आदेशानुसार संघटनेच्या ध्येयधोरणानुसार समाजातील वंचित बहुजन कष्टकरी त्यांच्या न्याय हक्कासाठी नागरिकांसाठी लढणारी संघटना त्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी ही संघटना महाराष्ट्र भर कार्यरत आहे तसेच पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यामध्ये ही सामाजिक संघटना वाढत आहे असे मत बहुजन विकास आघाडीचे कोर कमिटी सेक्रेटरी अहमद सय्यद यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले