पुणे :
पत्रकार शंकर जोग
भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने महा विजय 2024 स्नेहसंवाद कार्यक्रम नुकताच कॅम्प येथील न्यू क्लब मध्ये संपन्न झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टी पुणे शहराचे माजी अध्यक्ष व माजी आमदार जगदीश मुळीक हे उपस्थित होते यावेळी विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला जगदीश मुळीक म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेली दहा वर्षात भारताबरोबर महाराष्ट्राचा विकास वेगाने केला अनेक वर्षापासून रखडलेल्या भारत सरकारच्या योजनांना मोदी सरकार यांच्या प्रयत्नातून मार्गी लागल्या यामध्ये पंतप्रधान आवास योजना पीएम किसान योजना पंतप्रधान विश्वकर्मा योजना महिलांसाठी उज्वला योजना सुकन्या समृद्धी योजना असे अनेक योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी मोदी सरकार यांनी आणल्या आपण आज या कार्यक्रमानिमित्त शपथ घेऊया 2024 मध्ये पुन्हा मोदी सरकार यांना निवडून आणूया असे यावेळी माजी आमदार जगदीश मुळीक यांनी सांगितले कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी सिख अल्पसंख्यांक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जसप्रीतसिंग सलुजा यांनी केले. यावेळी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चरणजितसिंग सेठी. अजित सिंग राजपाल. दिलीप गिरमकर. माधुरी गिरमकर. डॉ शैलेश चौबे. सृष्टी कुमार. रोमितसिंग गुरुदत्ता. मनमितसिंग अरोरा. यांच्यासह मोठ्या संख्येने सिख बांधव आदि यावेळी उपस्थित होते