आम आदमी पार्टी च्या पाठपुराव्यामुळे बजाज एलियन्स कंपनी बाहेर बसवण्यात आले बस स्टॉप

पुणे- येरवडा प्रभागातील बजाज एलियन्स येथे बस स्टॉप नसल्यामुळे नागरिकांना बस पकडण्यासाठी जीवाची पराकाष्टा करावी होती. बस स्टॉप नसल्याने बस कुठे ही थांबत होती किंवा सरळ निघून जात होती.. कड्याक्याच्या उन्हात बस साठी वाट पाहणे जीवावर बेतु शकते याबाबत त्वरित दखल घेऊन बस स्टॉप बसवावे अशी आम आदमी पार्टी च्या वतीने परिवहन महामंडळाचे अधिकारी मा.तुळपुळे यांच्याकडे मागणी करण्यात आली होती

आम आदमी पार्टी च्या मागणीला त्वरित प्रतिसाद देत अधिकाऱ्यांनी बस स्टॉप बसवला.. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बस स्टॉप ला हार घालत, अगरबत्ती ओवाळत, नारळ फोडून पूजन केले. गांधी नगर, जयप्रकाश नगर, यशवंत नगर, नेताजी नगर, भाट नगर भागातील नागरिकांनी संघटन सहमंत्री मा.मनोज शेट्टी, महिला आघाडी उपाध्यक्षा सौ.श्रध्दा शेट्टी यांचे आभार मानले

यावेळी युवक अध्यक्ष मा.अमित म्हस्के, अविनाश भाकरे, संतोष काळे, लक्ष्मण शेट्टी, उमेश शेट्टी, शबनम शेख, नौशीन शेख, शमा गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते मा. गणेश घायमुक्ते उपस्थित होते

Recent Post

× How can I help you?