पत्रकार शंकर जोग
जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे पुणे स्टेशन मालधक्का चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनामध्ये सुमारे 200 महिलांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांच्या हस्ते साड्या वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर उपाध्यक्ष व राष्ट्रवादी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा निरीक्षक मुनीर सय्यद. ख्रिश्चन सेलचे पुणे शहर उपाध्यक्ष शंतनू कुकडे. पुणे शहर सरचिटणीस संदीप गाडे. पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा अध्यक्ष नरेश जाधव. पुणे कॅन्टोन्मेंट कार्याध्यक्ष राहुल तांबे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व्यापारी विभागाचे पुणे शहर अध्यक्ष अनिल अग्रवाल. तुलसी नंबियार.
गणेश लांडगे. आदि यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे महिला आघाडी अध्यक्ष नीताताई गायकवाड यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता गुलशन शेख. सुनिता चव्हाण. ज्योती शेंडगे. निरजरा गायकवाड. मिनाज शेख. कौसर खान. मुमताज शेख. मनीषा किराड. दिव्या पाटील. वर्षा चव्हाण. आदींनी परिश्रम घेतले.