पत्रकार: शंकर जोग
चर्मकार समाजाला महाराष्ट्र शासन सेवा धारक म्हणून घोषित करून त्यांना शासनामार्फत हक्काचे घर देण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन चर्मकार महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भाचे निवेदन रिपब्लिकन चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजू भाऊ बनसोड यांच्या हस्ते पुणे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना देण्यात आले होते. यावेळी रिपब्लिकन चर्मकार महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे सचिव विजय वरछाय. जिल्हा उपाध्यक्ष गजानन अवसारे. महाराष्ट्र राज्याचे खजिनदार सुनील राठी. पुणे जिल्हा महिला अध्यक्षा नर्मदा देवमन उतपुरे. आदि यावेळी उपस्थित होते.
ज्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने इतर समाजाला घरकुल मंजूर केली आहे. त्याच धर्तीवर पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात चर्मकार बांधवांना शासनाने सेवाधारक म्हणून घोषित करून त्यांना हक्काचे घर द्यावीत असे निवेदनामध्ये मागणी करण्यात आली आहे.