जनरल सॅम माणिकशॉ यांची 110 वी जयंती सॅम माणेक शॉ पुतळा कवीन्स गार्डन पुणे येथे साजरी करण्यात आली. यावेळी चिप ऑफ आर्मी स्टाफ हेडकॉटर सदन कमांडचे निवृत्त लेफ्टनंट जनरल आर.के.छाबरा यांनी सांगितले की फील्ड मार्शल सॅम माणिकशॉ यांची करारी बुद्धिमत्ता व धाडसी साहस आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे कर्तुत्व पाहता त्यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी लेफ्टनंट जनरल आर के छाबरा (निवृत्त) यांनी केली.
कार्यक्रमाचे संयोजन सकल मराठा समाज पुणे कॅम्प विभागाने केले होते या प्रसंगी कर्नल प्रतापराव चव्हाण
शैलेंद्रजी बिडकर ( मा सदस्य पीसीबी), विजय जाधव समाजसेवक, इमाद भाई सय्यद समाजसेवक, किशोर संगे लिया संचालक पुणे कॅन्टोन्मेंट सहकारी बँक, शिवाजीराव शिंदे, दिलीप भिकुले सर, रोहित मस्के, चेतन पैलवान, आकाश चव्हाण, निखिल टेकवाडे, ऋषिकेश पवार, राहुल जगताप, बबनराव भोसले, राजेश पुरम आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संयोजन आणि सूत्रसंचालन सकल मराठा समाज पुणे कॅन्टोन्मेंट चे समन्वयक राजाभाऊ चव्हाण यांनी केले