शिरूर लोकसभेत काय भूमिका घ्यायची ते शेतकरीच ठरवणार :- पवळेजिल्हा रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या बैठकीत निर्णय


आळंदी ( मल्हार भाऊ काळे) :

खेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेत जमिनीवरील चासकमान धरण पुनर्वसन शिक्के काढण्याचा विषय प्रलंबित ठेवण्यात आला असून ते शिक्के काढून घेणे यास प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी शेतकरी पाठपुरावा करीत आहेत. मात्र या विषयाकडे लोक प्रतिनिधी यांनी केलेले दुर्लक्ष यामुळे शेतक-यांवर अन्याय झाला आहे. यासाठी काळूस येथे रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या होणाऱ्या मेळाव्यात शिरूर लोकसभेत काय भूमिका घ्यायची ते आता शेतकरीच ठरवतील असा खणखणीत इशारा खेड तालुका रयत क्रांती शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुभाष पवळे यांनी दिला आहे.


शिरूर लोकसभा मतदार संघाचे निवडणुकीचे निमित्ताने सदाभाऊ खोत प्रणित रयत क्रांती शेतकरी संघटनेची बैठक रयत क्रांती शेतकरी संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष निलेश देवकर यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी संघटनेच्या कार्याचा आढावा तसेच शिरूर लोकसभा मतदार संघात होत असलेल्या निवडणुकी बाबत चर्चा करण्यात आली.


या प्रसंगी संघटनेचे पुणे जिल्हा प्रवक्ते गजानन गांडेकर, पश्चिम विभाग जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत काळभोर, सरचिटणीस सयाजी मोरे, तालुकाध्यक्ष शिरूर अण्णा फराटे, खेड तालुकाध्यक्ष सुभाष पवळे,युवा उपाध्यक्ष हवेली गणेश साळुंखे, अर्जुन आव्हाळे, हवेली तालुकाध्यक्ष विठ्ठल चोरघे, मीननाथ साळुंखे, सुनील पोटवडे, विठ्ठ्ल अरगडे, विश्वनाथ पोटवडे, भरत अरगडे, नवनाथ जाधव, सुरेश कौठकर, दादाभाऊ रोकडे, गणेश खैरे, संतोष खलाटे, बाळासाहेब दौंडकर आदींसह शेतकरी, नागरिक उपस्थित होते.


या बैठकीत शिरूर लोकसभा मतदार संघातील विविध तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. तालुकावार पदाधिकारी यांनी आपापल्या भागातील समस्यां संघटनेच्या कामाची माहिती देत आढावा दिला. यावेळी अनेक पदाधिकारी यांनी शिरूर लोकसभा मतदार संघ हा राष्ट्रवादी काँग्रेस ला ( अजित पवार गट ) सोडण्यात आला आहे. मात्र महायुती अंतर्गत मित्र पक्ष असलेल्या रयत क्रांती शेतकरी संघटनेस तसेच मतदार संघातील पदाधिकारी यांना विश्वासात घेतले जात नाही. संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांचा फोटो तसेच पक्षाचे बोधचिन्ह झेंडा हे देखील महायुतीचे मित्र पक्ष संयुक्त प्रचार यंत्रणेतील साहित्या तयार करताना अगर सोशल मीडियात देखील अद्याप प्रदर्शित केले नाही. या बाबत अनेकांनी नाराजी व्यक्त करीत महायुतीचा धर्म पळत असताना संबंधित उमेदवारांचे पक्षसंघटनेने प्रचार यंत्रणा पाहत असताना कार्यात विश्वासात घेतले नाही तर मतदार संघात काम करण्याचा फेरविचार करावा लागेल असा इशारा देत प्रचार यांत्रेपासून दूर राहून तटस्थ भूमिका स्वीककारावी लागेल असा इशारा या बैठकीत पदाधिकारी यांनी दिला आहे. सर्वानी महायुतीचा धर्म पळत असताना मतभेद बाजूला ठेवून काम करण्याची गरज आहे. मात्र रयत क्रांती शेतकरी संघटनेस शिरूर लोकसभा मतदार संघात अद्याप परंत सन्मानाने वागणूक मिळाली नाही. सभा,

बैठका, मेळावे यात सहभागी होण्या बाबत कोणत्याही प्रकारची यंत्रणा कार्यरत नाही. सुसंवाद ठेवण्यात आला नसल्याने य पुढील काळात विश्वासात न घेतल्यास तमाम शिरूर लोकसभा मतदार संघातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शेतकरी निवडणूक प्रक्रीतून तटस्थ राहतील असा इशारा खेड तालुका अध्यक्ष सुभाष पवळे यांनी दिला आहे.


काळूस बैठकीत पदाधिकारी यांनी मित्र कशाचे धोरणावर टीका करीत स्थानिक पदाधिकारी यांना मीटिंग बोलावले जात नाही, चासकमान धरण पुनर्वसन शिक्के काढून घेणे हा येथील मुख्य प्रश्न प्रलंबित राहिला आहे. यामुळे परिसरातील शेतकरी प्रचंड नाराज असून आपल्या महायुती मित्र पक्ष आघाडीतील शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांचा फोटो आणि संपूर्ण शिरूर मधील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांस सन्मान पूर्वक सुसंवाद ठेवण्याची मागणी करण्यात आली. रयत क्रांती शेतकरी संघटनेची राज्यात भाजप बरोबर युती आहे. स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन सुसंवाद ठेवणे आवश्यक आहे. देशात मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी एकत्र येवून काम करणे आवश्यक असताना मित्र पक्ष उमेदवार यांचे कडून प्रचार यंत्रणा राबविताना सन्मान मिळावा हीच माफक अपेक्षा यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. शिरूर लोकसभा मतदार संघात रयत क्रांती शेतकरी संघटनेचा झेंडा, लोगो, नेत्यांचे फोटो प्रसारित करून संवाद कायम राहील अशी आशा यावेळी शिरूर लोकसभेचे प्रचार प्रमुख प्रदीप कंद यांचेशी व्यक्त करण्यात आली.

महायुतीतील घटक पक्षांना विश्वासात न घेतल्यास वेगळा विचार करावा लागेल असा खणखणीत इशारा पुणे जिल्हा रयत करणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष निलेश देवकर यांनी बैठकीत दिला आहे.जिल्हा प्रवक्ते गजानन गांडेकर म्हणाले, या पुढील काळात चासकमान धरण पुनर्वसन शिक्के काढून घेणे याच साठी आमचा पाठपुरावा असेल आणि यासाठी वेळ प्रसंगी काळूस येथे संघटनेचा मेळावा देखील घेतला जाईल. या मेळाव्यात शिरूर लोकसभेत काय भूमिका घ्यायची ते मेळाव्यात शेतकरीच ठरवतील असे सांगितले. बैठकीचे संयोजन खेड तालुका अध्यक्ष सुभाष पवळे, जिल्हा प्रवक्ते गजानन गांडेकर यांनी केले.

× How can I help you?