आळंदी ( मल्हार भाऊ काळे) :
येथील श्री आवेकर भावे रामचंद्र संस्थान ट्रस्ट संस्थापिका कै. चंद्रभागाबाई आवेकर यांनी इंद्रायणी किनाऱ्यावर श्री राम मंदिर सन १८४० मध्ये लक्षवेधी बांधले. श्रीराम मंदिरात श्रींचा जन्मोत्सव १८४ वे वर्ष साजरे करीत आहे. या निमित्त मंदिरात लक्षवेधी विद्युत रोषणाई आणि पुष्प सजावट करण्यात आली आहे. आळंदी पंचक्रोशीतील भाविकांनी श्रीराम नवमी उत्सवाचे कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन आवेकर भावे रामचंद्र संस्थान चे वतीने करण्यात आले आहे.
श्री राम मंदिरात राम नवमी निमित्त १७ एप्रिल पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे परंपरेने उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. विविध धार्मिक कार्यकमांत संगीत, नृत्य, भजन, नारदीय कीर्तन ९ ते १७ एप्रिल या कालावधीत होत असल्याचे आवेकर भावे रामचंद्र संस्थानचे सरपंच संजय आवेकर यांनी सांगितले.
या धार्मिक उत्सव पर्वणीत ह. भ. प. वासुदेवबुवा बुरसे यांची नारदीय कीर्तन सेवा सुरु आहे. यास गायक श्यामजी गो-हाणे ( तबला ) , नाना पांढरे ( हार्मोनियम ) साथ देत आहेत.
श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यात डॉ. परिमल फडके यांचे भरतनाट्यम कार्यक्रमास उपस्थितांची मोठी दाद
मिळाली. ह. भ. प. ज्ञानेश्वरी रोकडे, पंढरीनाथ रोकडे, निवृत्ती महाराज दाभेकर यांची भजन सेवा त्यानंतर गीतरामायण स्वरांजली उत्साहात झाली. मुक्ता कुलकर्णी यांनी श्रीरामाचे भक्तवैभव सादर केले. सुनीता गुणे यांनी गीत सुद्धा रामायण सादर केले. आबासाहेब गोडसे, निवृत्ती गोडसे यांनी वारकरी भजन सेवा रुजू केली. आरती सरदेसाई यांचे भक्तीगीत व भावगीत सादरीकरण झाले.
शनिवारी ( दि.१३ ) अभिषेक तेलंग श्रीरामाची गाणी, वैभव दातार अपरिचित रामायण सादर करणार आहेत. रविवारी ( दि. १४ ) दत्ता चितळे आणि सहकारी यांचे गीतरामायण होईल. सोमवारी ( दि. १५ ) ज्योती गो-हाणे, सोहं गो-हाणे आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या वनिवुन अभंग आणि भक्तिगीते सादर करतील. मंगळवारी ( १६ ) राधाकृष्ण महाराज गरड भजन सेवा, अंतर्यामी सूर पं. श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलेली गाणी होणार आहेत. यावेळी अभिजित पंचभाई, दीप्ती कुलकर्णी आणि सहकारी साथ सांगत देणार आहेत. बुधवारी ( दि. १७ ) रोजी श्रीराम जन्मोत्सवावर आधारित बुरसे महाराज यांची नारदीय कीर्तन सेवा, महाप्रसाद वाटप आणि संध्याकाळी साडेपाच वाजता श्री रामाची पालखी नगरप्रदक्षिणा होऊन रामजन्मोत्सवाची सांगता होईल.