डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अखिल रमाबाई भीमराव आंबेडकर व्यापारी संघटनेच्या वतीने पाणी वाटप लाडू वाटप,

पुणे :
पत्रकार शंकर जोग

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अखिल रमाबाई भीमराव आंबेडकर व्यापारी संघटनेच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालय समोरील डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार बारामती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले होते, यावेळी उपस्थित भीमसैनिकांना पाणी वाटप व लाडू वाटप खा सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गटाचे) पुणे शहर उपाध्यक्ष आनंद सवाणे यांनी केले होते,


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गटाचे) पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, रवींद्र अण्णा माळवतकर, बाळासाहेब गायकवाड, प्रशांत कांबळे, प्रशाल अल्हाट, विनोद तावरे, महेंद्र कांबळे, आ दि यावेळी उपस्थित होते

× How can I help you?