पुणे :
पत्रकार शंकर जोग
पुणे: अखिल भवानी पेठ श्री स्वामी समर्थ सेवा मंडळातर्फे स्वामींच्या प्रकटदिनानिमित्त विविध धार्मिक व
सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ॲक्युप्रेशर थेरेपी, मोफत नेत्र तपासणी, आधार कार्ड दुरुस्ती, सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान, पोस्टमन काकांचा सन्मान, महिलांकरता मेहंदी स्पर्धा, स्वच्छ आपला परिसर उपक्रम असे आदी कार्यक्रम घेण्यात आले होते. तसेच सुमारे पाच हजार भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवन चारित्र्यावर इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी व्याख्यान केले.
कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष विकी पांडुरंग ढोले यांनी केले.
सलग 16 वर्षापासून हे या उपक्रमाच्या माध्यमातून स्वामींची अविरत सेवा करत असल्याचे ढोले यांनी सांगितले. कार्यक्रमाप्रसंगी महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, आमदार सुनील कांबळे, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, ज्येष्ठ समाजसेवक मिलिंद एकबोटे, माजी नगरसेविका अर्चना पाटील, माजी नगरसेविका आरती कोंढरे, माजी नगरसेवक सम्राट थोरात, राजेंद्र काकडे, माजी नगरसेवक मनीष साळुंके सिद्धेश घोणे , निलेश राऊत,सौरभ निंबाळकर, जगदीश गोरट्याल, प्रसाद परदेशी उत्कर्ष ताडे,आदी मान्यवर उपस्थित होते.