कोंढवा पारगेनगर येथे ईद मिलन कार्यक्रम पार पडला.

पुणे प्रतिनिधी, सध्या हिंदू मुस्लिम अशा भावनिक शब्दांचा प्रयोग करून मतांचे धृवीकरण करणारे राजकारण आहे तर दुसरीकडे हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन देणारे असे कार्यक्रम आपण पाहतो खरंतर भारताची ओळखच सामजिक एकता आहे. याचं अनुषंगाने युवा नेतृत्व फैजान पटेल यांनी ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री श्री रमेश दादा बागवे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग पुणे जिल्हा प्रमुख सोहेल खान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुणे शहर प्रमुख संजय मोरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र वाहतूक सेना पुणे जिल्हा अध्यक्ष मारुती घुले, नगरसेवक अविनाश बागवे अदी मान्यवर उपस्थित होते. जागृती फाउंडेशन तर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. जागृती फाउंडेशनचे समृद्धीचे झाकीर पठाण यांनी हस्ते पुणे शहर प्रमुख शिवसेना बाळासाहेब ठाकरे संजय मोरे यांना पुष्पगुच्छ शाळा देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे आयोजन
महाराष्ट्र वाहतूक सेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्य चिटणीस जागृती फाउंडेशन महाराष्ट्र अध्यक्ष फैजान पटेल यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Recent Post

× How can I help you?