शिक्षण महर्षी एमडी शेवाळे सर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त नाना पेठ अहिल्या आश्रम येथे डीसीएम सोसायटी ऑफ इंडिया या शैक्षणिक संस्थेमध्ये अभिवादन सभा घेण्यात आले होते सकाळी शिक्षण महर्षी एमडी शेवाळे सर यांच्या पुतळ्यास डीसीएम सोसायटी ऑफ इंडिया संस्थेचे अध्यक्ष डी टी रजपूत सर व संस्थेचे जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले होते.
या अभिवादन सभेमध्ये डी टी रजपूत सर यांनी सांगितले महर्षी शिंदे यांनी स्थापन केलेली दि डिप्रेस्ड क्लासेस मिशन ऑफ इंडिया ही संस्था दिवंगत एमडी शेवाळे सर यांनी वाढवण्यासाठी भरपूर कष्ट केले अनेक शाखा सुरू केले. ही संस्था एक अग्रगण्य करण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न आहे असे यावेळी सांगितले.
यावेळी संस्थेचे खजिनदार सिद्धार्थ शेवाळे. संस्था प्रतिनिधी काजल शेवाळे. मुख्याध्यापिका शिल्पा भोसले. वर्षा पाटील. प्राचार्य डॉ. भारती सहस्त्रबुद्धे. उपप्राचार्य डॉ नरेश पोटे. मुख्याध्यापिका सुनीता भोसरेकर. गणेश बेंद्रे. डॉ बाळासाहेब सोनवणे. तसेच शिक्षक. शिक्षकेतर. कर्मचारी वर्ग उपस्थित होते.