पुण्याच्या कोथरूड परिसरातून गुरुवारी मध्यरात्री भयंकर घटना उघडकीस आली. अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कर्वे रोड परिसरात एका तरुणाचा अतिशय निर्घृणपणे खून करण्यात आला.चार ते पाच जणांच्या टोळक्याने त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास कर्वे रस्त्यावरील डहाणूकर कॉलनी परिसरात ही घटना घडली. श्रीनिवास शंकर वत्सलावर (वय २२, राहणार लक्ष्मी नगर डहाणूकर कॉलनी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्या संदर्भात अलंकार पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथक एक कडील पोलीस नाईक राजेंद्र लांडगे यांना बातमी दारामार्फत संशयित आरोपी हे दळवीनगर, आंबेगाव बुद्रुक याठिकाणी येणार असल्याची
बातमी मिळाली,सदर बातमीची खातर जमा करून,सापळा रचून पाच संशयित आरोपीना ताब्यात घेऊन चौकशी केली असता जुन्या भांडणाच्या कारणामुळे
खून केले बाबत कबुली दिली आहे.म्हणून सदर आरोपींना ताब्यात घेऊन अधिक चौकशी कामी त्यांची वैद्यकीय तपासणी करून रिपोर्टसह त्यांना पुढील तपास कामी अलंकार पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले.
सदरची उल्लेखनीय कामगिरी शैलेश बलकवडे अपर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर,अमोल झेंडे पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा पुणे शहर,सुनील तांबे सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा पुणे शहर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील खंडणी विरोधी पथक एक यांचे मार्गदर्शनाखाली
खंडणी विरोधी पथक एक गुन्हे शाखा पुणे शहर कडील साहाय्य पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक यशवंत ओंबासे,पोहवा सयाजी चव्हाण, अमोल आवाड, नितीन कांबळे, राजेंद्र लांडगे, विजय कांबळे, मयूर भोकरे, मधुकर तुपसुंदर यांनी केली आहे.