आलवसा फाऊंडेशन व छत्रपती फाऊंडेशन च्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त रक्तदानआलवसा फाऊंडेशन व छत्रपती फाऊंडेशन च्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त रक्तदान करण्यात आले.


सदर कार्यक्रमास विशेष उपस्थिती म्हणून रक्ताचे नाते ट्रस्ट चे प्रमुख व 178 वेळा रक्तदान करणारे मा रामभाऊ बांगर होते.मा रामभाऊ बांगर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्ती ला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्यासाठी संघर्ष करत बलिदान देऊन स्वराज्याशी रक्ताचे नाते निर्माण केले. आज देशात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असताना, छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त रक्तदान करून जयंती साजरी करणं हेच महापुरुषांना खरे अभिवादन असं आलवसा फाऊंडेशन व छत्रपती फाऊंडेशन च्या सभासद व पदाधिकाऱ्यांच मत झालं, व या कार्यक्रमाचं आयोजन केलं
या प्रसंगी मा रामभाऊ बांगर(अध्यक्ष रक्ताचे नाते), शंकर भडकवाड(अध्यक्ष आलवसा फाऊंडेशन व छत्रपती फाऊंडेशन) , सुजाताताई शेलार ,सुरेश खलसे , तुषार चन्ने , सचिन शेलार ,संतोष भिसे, संजय बावळेकर, नरसिंग दलालकर, सचिन मिरचे पाटिल(अध्यक्ष निसर्गराजा फाऊंडेशन), रोहित कांबळे, सुमित शेलार, राज पायगुडे, संतोष शिंदे(पुणेकर माझा सर्वेसर्वा),गणेश चांदणे, जनकल्याण रक्तपेढी चे मा संतोष आंघोळकर आणि सर्व कर्मचारी सहकारी व काही रक्तदाते उपस्तिथ होते .


रक्तदान का गरजेचे आहे, या विषयी आपले मत मांडताना मा. रामभाऊ बांगर यानी, पुण्या सारख्या शहरामध्ये रक्तदान होऊ शकते, पण गावखेड्यात प्रतिसाद कमी असल्याने गावखेड्यांना रक्ताची कमतरता भासते अशा वेळी त्यानी बाहेरगावी रक्तदान शिबिर आयोजित करुन तिथं रक्तदान करण्याचे आवाहन ह्या वेळी केले. त्याच बरोबर रक्तदानाचे फायदे आणि गरज याविषयी माहिती दिली.
संस्थेचे अध्यक्ष शंकर भडकवाड यानी रक्ताला जात, धर्म, प्रांत, भाषा असा कोणताही भेद, नसुन केवळ रक्तगट जुळला की रक्ताचे नाते तयार होते म्हणून ज्याला शक्य असेल त्या सर्वाणी रक्तदान करावे हे संगीतले .


महिला अध्यक्षा सुजाताताई शेलार यांनी महिलांना स्वतःच्या तब्बेतीची काळजी घेण्यास संगीतले व फास्टफूड पासून लांब राहून कॅन्सर सारख्या आजाराला महिला वर्गाला दूर राहण्याचा उपदेश करत रक्तदानाचे आवाहन केले.
छत्रपती फाउंडेशन चे उपाध्यक्ष संतोष भिसे यांनी तरुण वर्गाने जास्तीत जास्त रक्तदान करावे व आपले शरीर समृद्ध राहिल त्या साठी व्यायाम करण्याचा सल्ला ह्या वेळी दिला.
संस्थेचे कार्याध्यक्ष राज पायगुडे यानी सर्व समजाला संस्थेच्या वतीने रक्तदान करण्याचे आवाहन करुन एका रक्तदात्या मुळे चार लोकांचा जीव वाचवण्यासाठी रक्तदनाचा संजय स्वयस्फूर्तीने पुढाकार घ्यावा असे संगीतले व उपस्तिथ सर्वांचे आभार मानले

× How can I help you?