पुणे :
पत्रकार शंकर जोग
कल्याणीनगर भागात रविवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास आलिशान मोटारीने धडक दिली होती या अपघातात अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा दोघे (रा. मध्य प्रदेश) या दोन आयटी अभियंत्यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूला जबाबदार असलेले बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल त्यांचा मुलगा वेदांत अग्रवाल त्याच बरोबर दोन पब मालक आणि एक व्यवस्थापकाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे देवांग कोष्टी समाजाच्या
शिष्ट मंडळाच्या वतीने देण्यात आला. यावेळी राष्ट्रीय कोष्टी कोष्टा फेडरेशनचे अध्यक्ष अरुण वरोडे. बालाजी चिनके. देवांग कोष्टी समाजाचे पुणे शहर व पिंपरी चिंचवडचे युवक अध्यक्ष दत्ताभाऊ ढगे. भगवान गोडसे. रोहिदास वारे. राजेंद्र खटावकर. राजेंद्र चोथे. अश्विन चौथे. पुंडलिक पोहेकर. उल्हास कुमठेकर. शांताराम डोईफोडे. सोमनाथ टीकोळे. भरत आमने. इत्यादी कोष्टी समाज बांधव उपस्थित होते यावेळी आरोपींवर सक्त कारवाई करण्यात येईल याची ग्वाही देखील पुणे पोलीस आयुक्त यांनी शिष्टमंडळाला दिली.