बोपोडी :
दत्ता सूर्यवंशी.
संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या 2568 व्या जयंती निम्मित लोकोपयोगी सामाजिक संस्था वनवर्धिनी फाउंडेशनच्या वतीने बुद्ध पौर्णिमे निम्मित धम्म सकाळ बुद्ध सरणं गच्छामि बुद्ध भीम गीतांची मैफिल बोपोडी येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान्यात आयोजित करण्यात आली होती.
बुद्ध रूपास पुष्प वाहून मा. पी एम पी एल चे संचालक प्रकाशभाऊ ढोरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली. बोपोडीतील सर्व बौद्धाचार्य यांच्या हस्ते पूजा पठण करण्यात आले.
या प्रसंगी मा. नगरसेविका अर्चनाताई मुसळे, आनंद छाजेड, कार्यक्रमाचे आयोजक अध्यक्ष विजय ढोणे,सुनील माने, अविराज हुगे,उपाध्यक्षा अंकिता ढोणे, केंद्रीय शिक्षिका निशा मोहोळ, माधुरी गायकवाड,राजेंद्र मागाडे सर, अमोल ओव्हाळ, सुशील गरसुंद, संतोष खरात, गणेश लांडे, त्रिरत्न साळुंके इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी धार्मिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या बौद्धाचार्यांचा अंकिता ढोणे, विजय ढोणे आणि विनय ढोणे यांच्या हस्ते पांढरे शुभ्र व्रस्त्र देऊन सन्मान करण्यात आला. आपल्या बहारदार आणि जादुई आवाजाने धम्मसकाळ रंगविणारे लोकप्रिय गायक चंद्रकांत शिंदे, भीमाचा किल्ला फेम प्रविण येवले, अरुण येवले आणि सहकाऱ्यांनी उपस्स्थितांचे भरपूर वैचारिक प्रबोधन केले.
या उदघाट्न प्रसंगी प्रकाश ढोरे म्हणाले जगाला शांतीचा संदेश देणारे तथागतांचे वैज्ञानिक विचार आपण सर्वांनी आचरणात आणले पाहिजे आणि तळागाळातील सामान्यांन पर्यन्त धम्म पोहचविला पाहिजे. प्रास्ताविक अविनाश कदम सूत्रसंचालन ऍड. ज्ञानेश्वर जावीर आणि आभार अंकिता ढोणे यांनी मानले.