भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त शाक्य विकास मंडळ ट्रस्टच्या वतीने बुद्धरूप प्रतिष्ठापना भव्य शांती संदेश यात्रा
शाक्य विकास मंडळ ट्रस्ट व सुजाता महिला संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त पांडवनगर येथील शाक्यमुनी बुद्ध विहारा मध्ये थायलंड येथून आणलेली भगवान गौतम बुद्धांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक अशोक थिवरे यांच्या हस्ते करण्यात आली होती तसेच शांती संदेश यात्रा काढण्यात आली होती, यावेळी सामूहिक बुद्ध वंदना करून व उपस्थित त्यांना खीर वाटप करण्यात आले,
यावेळी आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते वसंतदादा साळवे, शाक्य विकास मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष विलास घोगरे सर, सुजाता महिला संघाच्या अध्यक्षा मायाताई मोरे, भारतीय बौद्ध महासभा शाखा अध्यक्ष सुरेश भोसले, मंडळाचे कार्याध्यक्ष प्रभाकर सरोदे, माजी उपमहापौर मुकारी अण्णा अलगुडे, माजी नगरसेवक निलेश निकम, दयानंद इरकल, संदीप चव्हाण, आदि यावेळी उपस्थित होते