पत्रकार : शंकर जोग
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष रामदास आठवले यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये तिसऱ्यांदा मंत्रीपद मिळाल्याबद्दल दलित पॅंथर च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास दलित पॅंथर चे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत नडगम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित कार्यकर्ते. पदाधिकारी. नागरिकांना पेढे वाटप करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी यशवंत नडगम म्हणाले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला व नामदेव दलित पॅंथरचे संस्थापक अध्यक्ष नामदेव ढसाळ यांच्या दलित पॅंथर संघटनेला खऱ्या अर्थाने पुन्हा तिसऱ्यांदा न्याय मिळाला महाराष्ट्रातील आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यां मध्ये आनंदाचे वातावरण असून.
यावेळी विशाल ओवाळ. संजय शिंदे. राजकिरण ठोंगे पाटील. संजय पोटभरे. आकाश पायाळ. सोमनाथ. साळवे. सनी कोरे, सनी पंजाबी. अविनाश मोरे. लहू लांडगे. कोंडके शिंदे. जॅक्सन पनेम. पप्पू पाटील. आदी यावेळी उपस्थित होते