चर्मकार समाजाला सेवाधारक घोषित करून शासनामार्फत हक्काचे घर देण्यात यावे. संजू भाऊ बनसोड संस्थापक अध्यक्ष रिपब्लिकन चर्मकार महासंघ महाराष्ट्र राज्य

पत्रकार : शंकर जोग

चर्मकार समाज हा पिढ्यानपिढ्यापासून महाराष्ट्र मध्ये रस्त्यावर बसून लोकांची सेवा करत आहे चर्मकार समाजाला शासनाने आत्तापर्यंत सेवाधारक घोषित केले नाही चर्मकार समाजाला सेवाधारक घोषित करावे व त्यांना हक्काचे घर देण्यात यावे याकरिता रिपब्लिकन चर्मकार महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजू भाऊ बनसोड यांच्या नेतृत्वाखाली भव्य आंदोलन करण्यात आले होते

या आंदोलनामध्ये पिंपरी चिंचवड पुणे शहर व जिल्ह्यातून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पुणे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना या संदर्भाचे निवेदन देण्यात आले होते.
यावेळी संघटनेचे महाराष्ट्र सचिव विजय वरछाये. खजिनदार सुनील राठी. कार्याध्यक्ष रमेश बडगे. शिवलाल चिंचोले सचिव पिंपरी चिंचवड. जिल्हा महिला अध्यक्षा नर्मदा उतपुरे. जिल्हा उपाध्यक्ष गौरी बसेरे. हवेली तालुका अध्यक्ष इंदू पुरभे. पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष प्रभाकर उदपुरे. पिंपरी चिंचवड महिला अध्यक्ष दुर्गा करंगे. शिक्रापूर अध्यक्षा सविता सोनारे. जिल्हाध्यक्ष गजानन बिजोरे. गटई

कामगार जिल्हा उपाध्यक्ष सुनील चराटे. जिल्हा कार्याध्यक्ष लखन बेदरकर. चिंतामण बहिरे. शालिग्राम सरसरे. आदि यावेळी उपस्थित होते हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर संघटनेच्या मागण्या मान्य न झाल्यास संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष संजूभाऊ बनसोड यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे असा इशारा शासनाला देण्यात आला



× How can I help you?