अखिल भारतीय मजदूर काँग्रेसच्या वतीने डॉ. चंद्रकांत मस्के यांच्याकडे विविध समस्यांच्या मागण्या.

पुणे :
पत्रकार शंकर जोग

ससून रुग्णालयातील नवनियुक्त अधिष्ठता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांची नियुक्ती झाल्याबद्दल अखिल भारतीय मजदूर काँग्रेस युनियनच्या वतीने अध्यक्ष डॉ. अनुपम बेगी यांच्या हस्ते डॉ. चंद्रकांत मस्के यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेच्या वतीने विविध समस्यांचे मागण्या सोडवण्याच्या साठी चर्चा करण्यात आली यामध्ये सफाई कामगार वारसहक्क प्रकरण बदली कामगारांना कायमस्वरूपी करण्यात यावी राज्यभरात सफाई कामगारांची संख्या चार लाख इतकी आहे एक लाख सफाई कामगारांची पदे रिक्त आहे ही पदे भरण्यासाठी राज्य सरकार योग्य पावले उचलत नाही कोरोना काळात सफाई कामगारांना 1000 रुपये भत्ता देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते. त्याचाही अंमलबजावणी झाली नाही असे विविध मागण्यासाठी चर्चा करण्यात आली होती.
यावेळी ससून रुग्णालयातील कर्मचारी तक्रार निवारण समितीचे सदस्य किशोर साळुंके. महेंद्र चव्हाण. संजय जेधे. आदि यावेळी उपस्थित होते

× How can I help you?