विशेष मागास प्रवर्ग अन्याय निवारण कृती समिती च्या वतीनेविशेष मागास (एस. बी. सी.) प्रवर्गासाठी परदेशी शिक्षणासाठी 75% टक्के अट रद्द करण्याबाबत.

विशेष मागासवर्ग (एस. बी. सी.) व वि. जे. एनटी. या प्रवर्गासाठी परदेशी शिक्षणासाठी 75% मार्कची अन्यायकारक अट रद्द करण्याबाबत विशेष मागास प्रवर्ग (एस. बी. सी.) अन्याय निवारण कृती समिती महाराष्ट्राच्या वतीने खासदार निलेश लंके यांच्याशी चर्चा करून निवेदन सादर करण्यात आले होते यावेळी खासदार निलेश लंके यांनी सांगितले शासनाचा हा निर्णय मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहे असे म्हणत लवकरच राज्यातील विणकर आणि विशेष मागास प्रवर्ग एसबीसी समाजातील प्रतिनिधींशी पुण्यामध्ये बैठक घेणार असून व याविषयी शासनाची चर्चा करून ही अट पूर्ववत 60% करण्याविषयी मागणी करू असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी विशेष मागास प्रवर्ग (एस. बी. सी.) अन्याय निवारण कृती समितीचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र कांचनी. सचिव किशोर चंदावरकर. विणकर महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील मेटे. श्रीकांत यनम. नवनाथ लंके. आदि यावेळी उपस्थित होते

× How can I help you?