गुजरात राज्यातील पावागड येथे रविवारी दिनांक 16 रोजी अति प्राचीन जैन मूर्तींची विटंबना करण्यात आली या प्रकरणातील दोषींवर तत्काळ कारवाई व्हावी या मागणीसाठी सकल जैन समाज व राष्ट्रीय जैन सेनेच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला त्याची सुरुवात पत्रा गल्ली रामोशी गेट येथून पुणे जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत काढण्यात आली होती या संदर्भाचे निवेदन गृह विभागाचे तहसीलदार बाळासाहेब शिरसाट यांना देण्यात आले होते,
जैन साधूंवरील हल्ले प्राचीन जैन तीर्थांवर होणारे अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि शांतिप्रिय जैन समाजाला वेळोवेळी अशा विविध आघातांना समोर जावे लागत आहे पावागड घटनेने जैन समाज दुखावला आहे,
या घटनेचे पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री, पुरातत्त्व विभाग, आणि गुजरात सरकारने दखल घेत हस्तक्षेप करावा, अशी मागणी जैन समाजाच्या वतीने केली,
मोर्चाचे नेतृत्व जैन आचार्य विराज सागरजी महाराज यांनी केले,
अशी माहिती अचल जैन, संदीप भंडारी, बाळासाहेब धोका, महिंद्र सुंदेचा, यांनी दिली,
या मोर्चामध्ये महावीर कटारिया, अभय छाजेड, श्रीमल बेदमूथा, विनोद सोळंकी, निमेश शहा, स्नेहल मेहता, मयूर सरनोद, संदेश वेदमूथा, राजेश सालेचा, सतीश पाटील, प्रकाश बोरा, प्रीतम ओसवाल, अभिजीत शहा, पंकज मेहता, अक्षय परमार, उमेश ओसवाल, आशिष कटारिया, ऋषिकेश शहा, पार्थ वखा रिया, प्रकाश बाफना, पियुष बाफना, मितेश जैन, स्मितेश चौहान, प्रीती पाटील, सरला राठोड श्रुती मेहता, हेमलता भंडारी, सौरभ धोका, उमेदमल धोका, संजय मंडलेचा, यांच्यासह हजारो जैन बांधव भगिनी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते