पुणे :
पत्रकार शंकर जोग
अखिल भारतीय मजदूर काँग्रेसच्या वतीने बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अर्थात ससून रुग्णालयाच्या अधिष्ठता पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ, एकनाथ पवार यांच्याकडे सोपवल्याबद्दल
अखिल भारतीय मजदूर काँग्रेस चे संस्थापक, अध्यक्ष डॉ, अनुपम बेगी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी सफाई मजदूर कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली,
यामध्ये सफाई कामगारांची घरे पाडण्यात आली त्यांना विविध ठिकाणी व्यवस्था केल्याने त्या सफाई कामगारांच्या मुलांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे, एकीकडे महाराष्ट्र शासन आणि महानगरपालिका म्हणते 20 -25 वर्ष सफाई कामगार त्या घरात राहतात त्यांना त्यांच्या नावाने घर करून द्या, सफाई कामगार वारस हक्क प्रकरण बदली कामगारांना कायमस्वरूपी करण्यात यावी, असे विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा करण्यात आली,
यावेळी राष्ट्रीय सचिव किशोर साळुंखे, महासचिव चेतन जेधे, महाराष्ट्र सचिव भारत जाधव, महाराष्ट्र अध्यक्ष मनोज लालबिगे, संजय जेधे, आळंदी शहर अध्यक्ष पंकज खैरे, पिंपरी चिंचवड महिला अध्यक्ष दयमंती अक्का आहेर, बुद्धराज कुडीया, किशोर करोते, राजेश सारशा, आदि यावेळी उपस्थित होते