7 ऑगस्ट राष्ट्रीय हॅण्डलूम विणकर दिवस म्हणून महाराष्ट्र शासनाने जाहीर करावा. महाराष्ट्र विणकर संघटनेची मागणी

पत्रकार शंकर जोग

विणकर संघटनेच्या विविध मागण्यांकरिता महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरिक पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली.

7/ ऑगस्ट हा राष्ट्रीय हॅन्डलूम विणकर दिवस म्हणुन शासकीय स्तरावर घोषणा करून जाहीर करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरिक पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे महाराष्ट्र विणकर संघटनेच्या वतीने करण्यात आली. आणि या चर्चेमध्ये यंत्रमाग धारकांचा बाधंकाम अनूदान मिळायला पाहीजे, तसेच विधानसभेच्या जागा लढविणे करीता किमान पाच ते सहा जागेवर विणकरांना संधी द्यावी अशी मागणी करण्यात आली निर्णायक मतदान खात्रीशीर मतदान कोठे होईल आपले उमेदवार खात्रीशीर कसे निवडून येतील, याचा अहवाल मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे देणार, तसेच
पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर महाराष्ट्रातील विणकर संघटनेतील प्रमुख कार्यकर्त्यांची मेळाव्याचे नियोजन करण्यात येणार आहे. अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील मेटे यांनी दिली.
यावेळी विशेष मागास प्रवर्ग (एस. बी. सी.) अन्याय निवारण कृती समितीचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र कांचानी,यांनी शैक्षणिक विषयावर चर्चा केली. यावेळी सचिव किशोर चंदावरकर. महेश साळुंखे. विजय नाईक आदि यावेळी उपस्थित होते.

× How can I help you?