नवीन शो ची घोषणा: सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर लवकरच येत आहे, ‘आपका अपना झाकिर

आप देखेंगे. हम देखेंगे. सब देखेंगे… सच्चा भारतीय ‘सख्त लौंडा’ कॉमेडीयन झाकिर खान सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर लवकरच लॉन्च होणार्‍या ‘आपका अपना झाकिर’ या शो द्वारे तुमच्या टेलिव्हीजन स्क्रीनचा कब्जा घेण्यासाठी सज्ज आहे. झाकिरचे बुद्धीचातुर्य आणि वादातीत करिश्मा असलेला आणि हशा, शायरी व ‘जिंदगी के नुस्खे’ यांचे एकत्रित पॅकेज असलेला हा शो खात्रीने एक आकर्षक अनुभव देण्याचे वचन देतो.

ही खास ऑफर झाकिरची विनोदबुद्धी आणि धमाल किश्श्यांमुळे आबालवृद्धांना एकदम टवटवीत आणि आनंददायी अनुभव प्रदान करून एक खास स्पर्श जोडून आपला ठसा उमटवण्याचे वचन देते. कॉमेडीच्या पलीकडे जाऊन काही पैलू उलगडणार्‍या, अष्टपैलू होस्ट झाकिर खान सोबत सामील व्हा, म्हणजे तुम्हाला कळेल की तो खरा ‘आपका अपना झाकिर’ का आहे.

टीझर येथे बघा: https://www.instagram.com/reel/C8ygmQyPBWq/?igsh=dTFpZ3Iwczh2a3gz

‘आपका अपना झाकिर’ लवकरच सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!

× How can I help you?