पुण्यातील पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना साक्षरता जनजागृती अभियानांतर्गत कॅम्प परिसरातील सेंट जॉन सेकंडरी स्कूलच्या पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी नाना पेठ एडी कॅम्प चौक येथे यात सहभाग घेऊन शिका शिकवा चे धडे वारकऱ्यांना दिले, तसेच न्यू नाना पेठ येथील संग्राम मंडळांने शाळेतील शिक्षक सुनील कांबळे यांना अभंग गायनाची संधी दिली विद्यार्थ्यांनी विविध घोषवाक्याने परिसर दुमदुमला जन जन साक्षर अक्षर कळे संकट टळे, प्रौढ शिक्षण प्रगतीचे लक्षण, अशा घोषवाक्यांनी विद्यार्थ्यांनी जनजागृती निर्माण केली,
यावेळी श्री जमीर शेख, अशपाक शेख, आरती केवटे, आरती पंडित आदि शिक्षक व शिक्षिका यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,
शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका मायै देठे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले हो