चर्मकार समाजाचे दहा-पंधरा आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेत आहेत, मात्र ते समाजाचा आवाज उचलत नाहीत राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या विचाराचा आमदार विधानसभेत गेला पाहिजे त्यासाठी महासंघाद्वारे विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून 50 उमेदवार उभे करणार आहे, अशी घोषणा माजी सामाजिक कल्याण मंत्री व चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप यांनी केली, तसेच पुढे म्हणाले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यकर्ते जमात होण्याचा संदेश दिला होता, पण समाज त्यांचे विचार पूर्ण करू शकला नाही, बाबासाहेबांचे विचार खरे करण्यासाठी समाजाने एकत्र आले पाहिजे, असे यावेळी व्यक्त केले, चर्मकार महासंघाचे राजकीय भूमिका आणि चर्मोद्योग व्यवसाय या विषयावर चर्चा झाली यावेळी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्यांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच राज्यस्तरीय कार्यकारिणी जाहीर करून पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र दिले,
भोसरी येथे अंकुशराव लांडगे नाट्यगृहात राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता,
यावेळी आमदार महेश लांडगे चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय सचिव व संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, महिला अध्यक्षा सरोज बिसूरे, प्रदेश अध्यक्ष माधव गायकवाड, डॉ, शांताराम कारंडे, प्रदेश निरीक्षक प्रा शशिकांत सोनवणे, राष्ट्रीय सचिव दत्तात्रेय गतिसे, राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंद गवळी, युवक प्रदेशाध्यक्ष रवींद्र खैरे, पुणे जिल्हा महिला अध्यक्ष सुवर्णा माने, सुदाम लोखंडे, अमर तांडगे, उर्मिला ठाकरे, पुणे शहर अध्यक्ष प्रवीण सोनवणे, यांच्यासहित राज्यातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते, शशिकांत सोनवणे यांनी प्रास्ताविक केले व प्रा दत्तात्रय शिंदे यांनी आभार मानले,